Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार


मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा कृत्रिम फुलांचा वापर पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने, अशा साहित्याचा वापर करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढून कारवाईबाबत स्पष्टता आणली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) विधानसभेत केली., कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे त्यांनी सांगितले.


भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनीही उपप्रश्नांद्वारे या समस्येचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कृत्रिम फुले आणि प्लास्टिक सजावटीच्या या साहित्यातील रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ आणि लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास उद्भवतात. दीर्घकालीन संपर्कामुळे कर्करोगाचा धोकाही संशोधनातून समोर आला आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.


ही फुले नद्या किंवा जलस्रोतांत विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. तसेच, ही फुले पाळीव प्राण्यांच्या पोटात गेल्याने त्यांच्या पचनसंस्थेवरही गंभीर परिणाम होतात. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचत आहे, असेही त्यांनी सांगितले.



डेकोरेटर्सवरही होणार कारवाई :


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अनेकदा कृत्रिम फुलांचे साहित्य जलस्रोतांत टाकले जाते, जे अत्यंत घातक आहे. शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्ट तरतुदी केल्या जातील. जर लग्न समारंभात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर झाला, तर संबंधित डेकोरेटरवरही कठोर कारवाई केली जाईल. आपण सनातन परंपरा मानणारे आहोत, त्यामुळे धार्मिक कार्यात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशा वेळी मुंबई पालिकेने नैसर्गिक फुलांची बाजारपेठ बंद केली असेल, ते ती सुरू करण्याबाबत आजच आदेश दिले जातील", असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून