Jahnavi Killekar : ‘ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र?’; रुचिता जामदारवर जान्हवी किल्लेकरची टीका, बिग बॉस व रितेश देशमुखांविरोधातील वक्तव्यांवर संताप

मुंबई : कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे या शोवर आणि सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यावर टीका केली. माझ्यासोबत भेदभाव झाला आणि मला माझी बाजू मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली नाही, अशी नाराजी तिने व्यक्त केली.


रुचिताच्या या वक्तव्यांवर आता ‘बिग बॉस मराठी ५’ ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत जान्हवीने बिग बॉस आणि रितेश देशमुख यांच्याविरोधात बोलणाऱ्या स्पर्धकांवर निशाणा साधला. “ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र का करताय?” अशा शब्दांत तिने रुचिताला सुनावले.



काय म्हणाली जान्हवी ?


जान्हवीने व्हिडिओमध्ये सांगितले की, महाराष्ट्रात अनेक कंटेंट क्रिएटर्स, अभिनेते आणि इन्फ्लुएन्सर्स बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. “बिग बॉस हा खूप मोठा शो आहे आणि त्या घरात जाण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात. अशा मोठ्या मंचावर संधी मिळाल्यानंतर त्या शोबद्दल वाईट बोलणं योग्य नाही,” असे ती म्हणाली.


पुढे थेट रुचिताचे नाव घेत जान्हवी म्हणाली, “बिग बॉस पक्षपाती आहेत किंवा रितेश देशमुख पक्षपाती आहेत, असं बोलणं चुकीचं आहे. त्या शोने तुम्हाला संधी दिली, ओळख दिली. त्यामुळे त्या मंचाचा आदर ठेवायला हवा.”





तिने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की, बिग बॉसच्या घरात असताना चुका होतात, गेम बदलतो, रागही येतो. “मीसुद्धा अनेक चुका केल्या. वीकेंडच्या वाराला मला बोलूही दिलं नाही, कधी ओरडाही मिळाला. तरी मी कधीही शोला किंवा रितेश सरांना दोष दिला नाही,” असे ती म्हणाली.


शेवटी जान्हवीने स्पष्ट इशारा देत म्हटले की, “माझ्यासाठी बिग बॉस हा देवासारखा शो आहे. या शोमुळे मला महाराष्ट्रात ओळख मिळाली. त्यामुळे कोणालाही या शोविरोधात किंवा रितेश देशमुखांविरोधात बोलणं मी सहन करणार नाही.”

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी