Matka King : विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज, १७ एप्रिलला रिलीज होणार ‘मटका किंग’

मुंबई : अभिनेता विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात लोकप्रिय प्राईम व्हिडिओनं विजयच्या आगामी ओरिजिनल ड्रामा सीरिज ‘मटका किंग’ वर्ल्डवाइड प्रीमियरची तारीख जाहीर केली असून येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी ही सिरीज रिलीज होणार आहे.


अभय कोरन्ने यांनी लिहिलेली आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी तयार करून दिग्दर्शित केलेली ही सिरीज १९६० च्या दशकातील बदलत्या बॉम्बेवर आधारित आहे. ही कथा एका कापूस व्यापाऱ्याभोवती फिरते, जो ‘मटका’ नावाची नवी जुगार प्रणाली सुरू करतो आणि श्रीमंतांच्या या छंदाला संपूर्ण देशभर पसरवतो.


ही सिरीज सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिदवानी आणि आशीष आर्यन यांनी ‘रॉय कपूर फिल्म्स’, ‘आटपाट’ आणि ‘SMR प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली निर्मित केली आहे.


या सिरीजमध्ये विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवर मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत.


यांच्यासोबत विनीत कुमार सिंह, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.


या सिरीजमद्ये १९६० च्या दशकातील बदलत्या बॉम्बेमध्ये स्वतःची ओळख आणि मान-सन्मान मिळवण्यासाठी झटणारा एक हुशार आणि मेहनती कापूस व्यापाऱ्याची कथा आहे. ज्याची भूमिका विजय वर्मा यांनी साकारली आहे.


गर्दीने गजबजलेले बाजार, चाळी आणि बदलणारी सत्ता यांच्यात ही कथा उभी राहते. एका महत्त्वकांक्षी कल्पनेपासून सुरू होणारी ही कथा हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करते.


जसजशी अपेक्षा आणि जोखीम वाढत जाते, तशी ही सीरिज महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि स्वतःची जागा निर्माण करण्याच्या रोमांचक प्रवासात रूपांतरित होते. ही सिरीज १७ एप्रिलपासून भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देशांमध्ये फक्त प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.


Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’