रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.


‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे.


‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.


चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे. रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’