DCM Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक जाहीर केली. येत्या १८ जून २०२६ रोजी या एका जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल. महाराष्ट्रासोबतच तामिळनाडूतील सी. व्ही. शन्मुगम यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही याच दिवशी निवडणूक होणार आहे.



सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ६ मे २०२६ रोजी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांचा हा कार्यकाळ ४ जुलै २०२८ पर्यंत होता. या जागी आता ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जातील, असा कयास बांधला जात आहे. शिवाय सुनेत्रा पवार यांचे दुसरे सुपुत्र जय पवार यांचेही नाव चर्चेत आहे.



विशेष म्हणजे याच दिवशी १८ जून रोजी विधानपरिषदेच्या १६ रिक्त जागांसाठी आणि नागपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.


निवडणूक कार्यक्रम असा

  • निवडणूक अधिसूचना जारी होणार : १ जून २०२६

  • नामांकन अंतिम तारीख : ८ जून २०२६

  • उमेदवारी अर्जांची छाननी : ९ जून २०२६

  • अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ११ जून २०२६

  • मतदानाचा दिनांक आणि वेळ : १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)

  • मतमोजणी : १८ जून २०२६ (सायंकाळी ५:०० वाजता)

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा