Nautapa Health Alert : पुढील सहा दिवस हे पदार्थ खाणे टाळा नाहीतर....

राज्यात नवतपाला सुरुवात होताच उष्णतेचा कहर वाढला आहे. कडक ऊन, गरम वारे आणि वाढता उकाडा यामुळे शरीरावर मोठा ताण येत आहे. अशा परिस्थितीत चुकीचा आहार घेतल्यास आरोग्याची गंभीर निर्माण समस्या होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते,नवतपादरम्यान काही पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान अधिक वाढते आणि डिहायड्रेशन, हिटस्ट्रोक, उलट्या, जुलाब, अशक्तपणा यांसारख्या त्रासांचा धोका वाढतो.


तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा


उन्हाळ्यात बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, फरसाण, समोसे यांसारखे तळलेले आणि तेलकट पदार्थ शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि थकवा जाणवतो. तसेच जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे घाम अधिक येतो व शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोक्का अधिक वाढतो.


कोल्डड्रिंकपासून सावध राहा


उकाड्यात अनेक जण थंडावा मिळावा म्हणून कोल्डड्रिंक, सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, या पेयांमधील साखर जास्त असते आणि कॅफिन शरीराला डिहायड्रेट करू शकते. चहा आणि कॉफीचे अतिसेवनही शरीरातील पाणी कमी करून उष्णतेचा त्रास वाढवू शकते.


रेड मीट आणि पॅकेज्ड स्नॅक्स घेणे टाळा


रेड मीट पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. याशिवाय चिप्स, वेफर्स, पॅकेज्ड स्नॅक्स यात जास्त मीठ असतो. अधिक सोडियममुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होऊ शकते.


शिळे अन्न खाणे टाळा


नवतपाच्या काळात उघड्यावर ठेवलेले जेवण किंवा खाण्याचे पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे फूड पॉयजनिंग, जुलाब, उलट्या अशा आजारांचा धोका वाढतो. तसेच अतिशय थंड पदार्थ किंवा मद्यपान केल्यास शरीरावर उलटे परिणाम होऊ शकतात.


मग काय खाल्लं पाहिजे?


तज्ज्ञांच्या मते, नवतपादरम्यान शरीर थंड आणि हायड्रेट ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी नारळपाणी, ताक, लस्सी, सत्तू (Sattu flour), कलिंगड, काकडी आणि ताजी फळे फायदेशीर ठरतात. दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि रिकाम्या पोटी बाहेर न पडणेही गरजेचे आहे. योग्य आहार आणि काळजी घेतल्यास नवतपाच्या तीव्र उष्णतेपासून स्वताचे संरक्षण करणे शक्य होऊ शकते.

Comments
Add Comment

Bhivpuri Project Alarm : भिवपुरी कॅम्पमध्ये स्फोटांचा धडाका; ६५ एकरांच्या धरण प्रकल्पातील ब्लास्टिंगचा धसका

रायगड : कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायत हद्दीतील धनगरवाडी आणि तापकीरवाडी परिसरात सुरू असलेल्या

Radhika Bhide : राधिका भिडेच्या आवाजाची पुन्हा जादू; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवं गाणं रिलीज

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) रंगात

Rahul Shewale : नेपाळमध्ये अडकलेले ५४ भारतीय सुखरूप मुंबईत दाखल; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत

मुंबई : नेपाळमधील महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेवर अडकलेले कैलास मानसरोवर यात्रेतील ५४ भारतीय भाविक अखेर सुखरूप

Cyber Crime : IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट Facebook अकाउंट; १७ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून २ लाखांची रोकड जप्त

बंगळूर : पोलीस उपआयुक्त (इलेक्ट्रॉनिक सिटी विभाग) नारायण एम. यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून

IAS Transfers : सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर, रवींद्र खेबुडकरांची पुण्यात बदली; राज्य शासनाकडून ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

Prakash Abitkar : सरकारी रुग्णालयांच्या सेवांना आता स्टार रेटिंग; गैरप्रकार आणि गुणवत्तेच्या कमतरतेवर आरोग्य विभागाची नजर - प्रकाश आबिटकर

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत व बाह्यस्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) दिल्या जाणाऱ्या आरोग्य