Mulshi Pattern 2 : 'मुळशी पॅटर्न २' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटिला, प्रवीण तरडेने केली घोषणा !

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'राजा शिवाजी'नंतर (Raja Shivaji) 'देऊळ बंद २' (Deool Band 2) या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे चित्रपटगृहात 'देऊळ बंद २' ला प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद. 'देऊळ बंद'ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांमध्ये जबरदस्त बॉक्स ऑफिस (Box Office Collection) कलेक्शन केलं होतं. दरम्यान, 'देऊळ बंद २'ला ही प्रेक्षकांनी पाठिंबा दिला आहे. 'देऊळ बंद २' चित्रपटगृहात धुमाकूळ घालत असताना आता प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांना खास सरप्राईज दिलं आहे. त्यांनी सुपरहिट 'मुळशी पॅटर्न'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या बातमीमुळे प्रेक्षकांना आनंद झाला आहे.



प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' या चित्रपटाला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची हाऊसफूल्ल गर्दी जमतेय. दरम्यान, 'देऊळ बंद २'च्या यशानंतर प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज दिले आहे. त्यांनी 'मुळशी पॅटर्न'च्या दुसऱ्या भागाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. 'मुळशी पॅटर्न २' हा सिनेमा इतका खतरनाक असेल की, तुमच्या अंगावर काटा येईल', असे प्रवीण तरडे म्हणाले.



त्यांच्या नव्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, 'देऊळ बंद २' नंतर शक्यतो मी 'मुळशी पॅटर्न २' कडे मी वळेन. मुळशी पॅटर्न १ या सिनेमातून मी शेती विकायची नसते, राखायची असते असं सांगितलं होतं. 'मुळशी पॅटर्न २' मधून, तुझ्या आणि माझ्या घराचं स्वप्न महाग का झालं? याचं उत्तर मुळशी पॅटर्न २ या सिनेमातून मिळणार', असं प्रवीण तरडे म्हणाले.



'सिनेमाचं नावच आहे, मुळशी पॅटर्न २ - तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट.. हा चित्रपट इतका जबरदस्त असेल.. की अंगावर काटे आणि शहारे येईल', असं प्रवीण तरडे म्हणाले. 'देऊळ बंद २ या सिनेमाची पब्लिसीटी झाली की, मीटिंग करायची आहे..लवकर सुरू करायचं आहे..', असंही प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडेंनी दिलेल्या हिंटनंतर प्रेक्षकांनी 'देऊळ बंद २' सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.


Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार