Crime : केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणाला नवे वळण ; उरुळी कांचन मधील डॉ. सुंदरम कदम संकटात

उरुळी कांचन : बहुचर्चित आणि बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढत आहे. उरुळी कांचन मधील डॉक्टर सुंदरम कदम आणि किकवी (ता. भोर) येथील डॉ. मंदार माळी हे या प्रकरणात सामील असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यवत पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील गर्भलिंगनिदानाच्या संशयित रॅकेटची पाळेमुळे अधिक खोलवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणाचा मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनचा वापर करून गर्भलिंगनिदान करण्यात येत होतं, असं पोलीस तपासात समोर आलं. परंतु हे मशीन त्याला कोण देतं असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरीला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने मशीन आरोपी नरेंद्र ठाकरे याने पुरवल्याची कबुली दिली. यानंतर नरेंद्र ठाकरेला अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.



आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं आहे .सध्या सौंशयपद असेलेले दोन आरोपी डॉ. सुंदरम कदम व डॉ. मंदार माळी हे दोघेही सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यवत पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव यांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.



या संपूर्ण प्रकरणामुळे उरुळी कांचन परिसरात भीतीचं वातावरण आहे . डॉ. सुंदरम कदमच्या नावावरील संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे . पोलिस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा