Me Savitribai Phule :'१४ जूनला प्रवास थांबेल, पण गोष्ट नाही'; अमोल कोल्हेंची भावनिक पोस्ट व्हायरल

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Me savitribai Jyotirao phule) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. TRPच्या कारणामुळे वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असून १४ जून रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. अवघ्या १५२ भागांमध्ये मालिका गुंडाळण्यात आल्याने प्रेक्षकांसह कलाकारांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.


मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. यावेळी कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी कलाकारांना धीर देत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, स्टार प्रवाहवरील मालिका संपत असली तरी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या कार्याची गोष्ट थांबणार नाही.



सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी 13 जूनपासून पुन्हा चित्रीकरण सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र हे चित्रीकरण कोणत्या वाहिनीवर किंवा कोणत्या माध्यमासाठी होणार आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे मालिका नव्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.





अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये "१४ जूनला स्टार प्रवाहवरील प्रवास थांबेल, पण गोष्ट नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास अर्धवट राहणार नाही," असे म्हटले आहे.


दरम्यान, मालिकेच्या अचानक झालेल्या समाप्तीमुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. आता अमोल कोल्हेंच्या घोषणेनंतर या मालिकेच्या पुढील प्रवासाबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या