Modi : जनसेवा हीच साधना : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : ''माझ्यासाठी जनता हीच देवाचे रूप आहे आणि म्हणूनच मी या सेवेकडे नेहमीच एक 'साधना' म्हणून पाहिले आहे. आपण कधीही या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता आणि सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे हे मी माझे परम भाग्य समजतो'', असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत असणारे लोकनिर्वाचित पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानिमित्त आयोजित एनडीए नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.



पुढे बोलताना ते म्हणाले, "तुम्ही सर्वांनी आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच संस्मरणीय बनवला आहे. मी अत्यंत भारावून गेलो आहे आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. 'चरैवेती, चरैवेती' (सतत पुढे चालत राहा) या मंत्राचा जप करत आणि या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहत, आपण कधी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचारही मी केला नव्हता. भारतमातेची इतका मोठा काळ सेवा करण्याची संधी मिळणे, हे केवळ ईश्वराच्या विशेष कृपेमुळेच शक्य आहे. माझ्यासाठी जनता हीच देवाचे रूप आहे आणि म्हणूनच मी या सेवेकडे नेहमीच एक 'साधना' म्हणून पाहिले आहे. ही साधना कधीही एकाकी नव्हती; हा एक सामूहिक 'यज्ञ' आहे, ज्यामध्ये तुम्ही सर्वांनी आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी कर्तव्य भावनेने आपले योगदान दिले आहे."



यावेळी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले, "माझा असा विश्वास आहे, कि जे कालपर्यंत गरीब होते आणि आता 'नव-मध्यमवर्ग' बनले आहेत, त्यांना आपण पुन्हा मागे पडू देता कामा नये. म्हणूनच, सरकार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण दिवस-रात्र काम केले पाहिजे. १४० कोटी जनतेने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला आणि अपेक्षांना पूर्ण करण्याच्या संकल्पाने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आपल्याला भारतातील तरुण, महिला, मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत."



दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एक ठराव मंजूर केला. यामध्ये देशातील सर्वाधिक काळ सेवा करणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्यात आले असून, हा दिवस भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे म्हटले आहे. ४,३९९ दिवस सलग निर्वाचित पंतप्रधान म्हणून सेवा करण्याचा विक्रम प्रस्थापित करत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला आहे. नेहरू यांनी १९५२ ते १९६४ या काळात सलग ४,३९८ दिवस निर्वाचित पंतप्रधान म्हणून सेवा केली होती. या ठरावात नमूद करण्यात आले आहे की, हा प्रसंग भारताची लोकशाही जाणीव, जनविश्वास आणि लोकसहभागाच्या शक्तीचे प्रतीक आहे, जे 'राष्ट्र प्रथम' या संकल्पाने प्रेरित असलेल्या नेत्याला जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याचे दर्शन घडवते.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.