Nivedita & Ashok Saraf : अशोक सराफांना लग्न करायचंच नव्हतं; सचिन पिळगांवकरांनी जमवली जोडी; सराफ जोडीच्या लग्नाची ही कहाणी अनेकांना माहिती नाही

Ashok Saraf & Nivedita Saraf Anniversary : मराठी कलाविश्वात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला आज ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तुम्हांला माहिती आहे का की दोघांचं लग्न हे त्यावेळेस जवळपास अशक्य होतं आणि याचं कारण म्हणजे निवेदिता सराफ यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. आणि सर्वात महत्त्वाचं कारण अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयातील अंतर. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या वयामध्ये १८ वर्षांचं अंतर आहे. हे अंतर पाहता अभिनेत्रीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. सोबतच चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही मुलाशी निवेदिताने लग्न करू नये अशी तिच्या आईची इच्छा होती.



सचिन पिळगावकरांचा पुढाकार अन...


सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितले, मी सर्वात महत्त्वाची जोडी जमवली.. ती म्हणजे अशोक आणि निवेदिता सराफ यांची. अशोक लग्नाला नाहीच म्हणत होता, लग्न नकोच असं त्याचं म्हणणं होतं. त्याआधी त्याचा अपघात झाला होता, त्यामुळे तो अत्यंत त्रासात होता. त्यातून तो हळुहळू सावरत होता. काम सुरू केल्यामुळे त्याला कामाच्या माध्यमातून एक वेगळं समाधान मिळत होतं. मग मी त्याची समजूत काढली होती. कारण, निवेदिताला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. बरं दुसऱ्या बाजूला निवेदिताची आई या लग्नाच्या अतिशय विरोधात होती. मग अशोक आणि मावशी या दोघांची समजूत काढत शेवटी २७ जून १९८९ मध्ये हे लग्न झालं.”



गोव्यात लग्न केलं कारण…


लग्नाच्या दोन दिवस आधीपर्यंत निवेदिता यांनी त्यांच्या आईला लग्नाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. गोव्यात मंगेशीच्या देवळात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. अशोक सराफ यांच्या आईची या जोडप्याचं मंगेशीच्या देवळात लग्न व्हावं अशी खूप इच्छा होती. या दोघांच्या लग्नाचा साग्रसंगीत सोहळा पार पडला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवेदिता यांचा भाऊ म्हणून सचिन पिळगांवकर यांनी अशोक सराफ यांचा कान पिळला होता.



आज लग्नाला ३७ वर्षे पूर्ण


आज लग्नाला ३७ वर्षे पूर्ण होताच निवेदिता यांनी खास पोस्ट शेअर करत अशोक सराफांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज लग्नाला ३७ वर्षे पूर्ण होताच निवेदिता सराफ यांनी लिहिले,, “आज ३७ वर्षांनंतरही तुझ्याकडे पाहताना माझं मन तेवढंच आनंदी होतं…माझा जिवलग मित्र, माझी ताकद आणि तू माझं प्रेम आहेस…लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’