Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी झुंज देत असल्याचा खुलासा केल्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री शुभा गोडबोले (Shubha Godbole Cancer) यांनीही आपण कॅन्सरवर उपचार घेत असल्याची माहिती सोशल मीडियावरील भावनिक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चाहते आणि कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


शुभा गोडबोले यांनी इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले असून त्यामध्ये त्यांचे नव्याने आलेले कुरळे केस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंसोबत त्यांनी 'केमो कर्ल्स' (Chemo Curls) बद्दलचा अनुभव मांडत कॅन्सरच्या प्रवासाविषयी मन मोकळे केले. (Shubha Godbole Cancer)



'केमो कर्ल्स' म्हणजे काय?


पोस्टमध्ये शुभा गोडबोले लिहितात, "माझे हे नवीन कुरळे केस माझ्या आधीच्या केसांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. 'केमो कर्ल्स' नावाची गोष्टही असते, हे मला गुगल केल्यावर समजलं. केमोथेरपीदरम्यान केस पूर्णपणे गळून गेल्यानंतर जे नवीन केस येतात, ते अनेकactor दा कुरळे असतात. काहींचे केस नंतर पुन्हा पूर्वीसारखे होतात, तर काहींचे कायम असेच राहतात. माझे हे 'केमो कर्ल्स' बहुधा कायमचेच राहणार आहेत. आता मला माझे जुने केस जास्त आवडायचे की हे नवे, हेच ठरवता येत नाही." त्यांच्या या प्रामाणिक आणि सकारात्मक शब्दांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. (Shubha Godbole Cancer)



गेल्या वर्षी झाले कॅन्सरचे निदान :


मिळालेल्या माहितीनुसार, शुभा गोडबोले यांना गेल्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असून त्या मोठ्या धैर्याने आणि सकारात्मकतेने या आजाराचा सामना करत आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवत जीवनाकडे आशावादी दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला आहे. (Shubha Godbole Cancer)



चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव :


शुभा गोडबोले यांच्या पोस्टनंतर चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या धैर्याचे आणि सकारात्मक विचारांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढताना शुभा गोडबोले यांनी दाखवलेली जिद्द आणि आत्मविश्वास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या भावनिक पोस्टने हजारो चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला आहे. (Shubha Godbole Cancer)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’