Acting : अभिनयापेक्षा फॉलोअर्स महत्त्वाचे? मालिका विश्वातील बदलत्या ट्रेंडवर ज्येष्ठ अभिनेत्रीने उपस्थित केला प्रश्न

मुंबई:
सध्या सोशल मीडियावरील लाईक्स(likes) आणि व्ह्यूज(views) पाहून रील स्टार्सना थेट मालिकांमध्ये कास्ट करण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. या बदलत्या ट्रेंडवर मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री(Actress) प्राजक्ता दिघे यांनी आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.



कलाकारांवर अन्याय :
एका मुलाखतीत बोलताना प्राजक्ता दिघे म्हणाल्या, पूर्वीच्या काळात एका प्रोजेक्टमधील अभिनय पाहून दिग्दर्शक(Director) कलाकाराला दुसऱ्या भूमिकेसाठी विचारणा करायचे. आम्हाला कधी काम मागण्यासाठी फोन करावे लागले नाहीत. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता तुमच्या इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स पाहून तुम्हाला कास्ट केले जाते. केवळ सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत म्हणून रील स्टार्सना काम दिल्यामुळे खऱ्या आणि अनुभवी कलाकारांवर अन्याय होत आहे.



गार्गी फुले यांनीही उपस्थित केला होता प्रश्न:



केवळ प्राजक्ता दिघेच नव्हे, तर याआधी ज्येष्ठ अभिनेत्री गार्गी फुले यांनीही याच मुद्द्यावर भाष्य करत इन्फ्लुएन्सर्सच्या अभिनय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १०-१० वर्षे मेहनत करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या कलाकारांची तुलना स्वतःला कंटेंट क्रिएटर्स म्हणवणाऱ्या रील स्टार्सशी होऊ शकत नाही. ते स्टार असतील, पण कलाकार नक्कीच नाहीत, अशा शब्दांत गार्गी फुले यांनी सुनावले होते.



थोडक्यात काय तर, पडद्यावर आणि रंगमंचावर अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सोपे नाही. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील लोकप्रियतेला(Popularity) अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’