udhayanidhi stalin : अभिनेत्री तृषावरील अश्लील टिप्पणी भोवली! विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप!

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मंगळवारी सकाळी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोडी समोर आली. अभिनेत्री तृषा (Trisha) हिच्यावर जाहीर सभेत अश्लील व द्विअर्थी टिप्पणी केल्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि 'डीएमके' (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण तामिळनाडूत राजकीय खळबळ उडाली आहे.



"अटक म्हणजे एक विनोदच!"; अटकेदरम्यान उदयनिधींची प्रतिक्रिया


सकाळी जेव्हा पोलीस उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांसोबत जात असताना उदयनिधींच्या चेहऱ्यावर हसू होते. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, "मी या अटकेला एक मोठा 'विनोद' मानतो आणि याविरोधात मी कायदेशीर लढाई लढेन."



जावूरमधील सभेत नक्की काय घडलं?


सोमवारी तंजावूर येथे कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरून विरोधी पक्षांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात भाषण करताना उदयनिधींनी मुख्यमंत्री जोसेफ विजय (Joseph Vijay) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "तामिळनाडूला कावेरीचे एक थेंबही पाणी मिळालेले नाही, तरीही मुख्यमंत्री निर्धास्त आहेत," असा आरोप ते करत होते. त्याच वेळी जमावातून कोणीतरी 'तृषा... तृषा...' असा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यावर उदयनिधींनी आपले भाषण थांबवले आणि चेहऱ्यावर उपरोधिक हास्य आणून एक आक्षेपार्ह द्विअर्थी वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वातावरण तापले.



टीव्हीके (TVK) ची राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार


उदयनिधींच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. पक्षाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) आणि पोलिसांकडे उदयनिधींविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, "एका सार्वजनिक आणि राजकीय व्यासपीठावरून एका नामांकित महिला अभिनेत्रीबद्दल अशा प्रकारे अश्लील, ओंगळवाणी आणि द्विअर्थी भाषा वापरणे म्हणजे महिलांचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे समाजात महिलांचा अनादर वाढतो."



"हा तर राजकीय सूड!"


उदयनिधी यांच्या अटकेवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झाले आहे. डीएमके नेते टी. के. एस. एलांगोवन यांनी या अटकेचा तीव्र निषेध करत म्हटले की, "उदयनिधी यांनी कोणाचाही अनादर केलेला नाही. त्यांनी केवळ मुख्यमंत्री विजय यांच्या अपयशाचा पाढा वाचला. त्यांनी भाषणात कुठेही तृषाचे नावही घेतले नव्हते. ही केवळ राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे." तर दुसरीकडे टीव्हीकेचे नेते अमेरिका नारायणन यांनी डीएमकेचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, "उदयनिधींना मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून नाही, तर एका महिलेचा जाहीर अपमान केल्यामुळे अटक करण्यात आली आहे."



भाजपचीही जोरदार टीका


तामिळनाडू भाजपनेही या मुद्द्यावर उदयनिधींवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपचे मुख्य प्रवक्ते नारायणन थिरुपती यांनी म्हटले होते की, "उदयनिधी यांचे वक्तव्य अत्यंत घाणेरडे, अश्लील आणि तितकेच लाजीरवाणे आहे. आई, बहीण किंवा पत्नी असलेला कोणताही स्वाभिमानी माणूस अशी भाषा वापरणार नाही. अशा व्यक्तीला अटक करून तुरुंगात टाकणेच योग्य ठरेल."



अभिनेत्री तृषा आणि राजकारणातील वाद


काही काळापासून अभिनेत्री तृषा आणि मुख्यमंत्री विजय यांच्यातील संबंधांच्या अफवांवरून चित्रपट आणि राजकीय वर्तुळात अनेकदा वादग्रस्त विधाने केली जात आहेत. यापूर्वी भाजप नेते नयनार नागेंद्रन यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते, ज्यावर तृषाच्या कायदेशीर टीमने कडक उत्तर दिले होते. मात्र, आता थेट विरोधी पक्षनेत्याला या प्रकरणात अटक झाल्याने हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी