Eknath Shinde : 'ज्ञानाचा महासागर हरपला'; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन


कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एक अजातशत्रू, दूरदर्शी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू कायम सर्वसामान्य माणूस होता. त्यांच्या जाण्याने "ज्ञानाचा महासागर हरपला असून, ही न भरून येणारी पोकळी आहे," अशा अत्यंत भावनिक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.



डॉ. डी. वाय. पाटील यांनी शेतकरी कुटुंबातून प्रवास सुरू करत आपल्या कर्तृत्वाच्या बळावर देशभरात शिक्षणाची नवी दालने उघडली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. पाटील यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. विविध उच्च पदांवर काम करूनही त्यांनी सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही, असे शिंदे म्हणाले.



मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील आणि त्यानंतरच्या अनेक आठवणींना उजाळा देताना शिंदे म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णालयाची आवश्यकता निर्माण झाली असता, बाळासाहेबांनी हे महाविद्यालय आपल्या परिवाराचा भाग असल्याची भावना ठेवून तातडीने आवश्यक मदत व मान्यता मिळवून दिली होती. अशा अनेक प्रसंगांत त्यांचे परस्परांवरील विश्वासाचे नाते दिसून आले.



डॉ. डी. वाय. पाटील हे सर्वांशी सलोख्याने वागणारे, सर्वांना आपलेसे करणारे आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. सहकार, शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले योगदान देशासाठी प्रेरणादायी राहील, असेही शिंदे यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नात्याचाही उल्लेख केला. डी. वाय. पाटील विद्यापीठाने मला मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केले. हा सन्मान माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आठवण आहे. त्याच संस्थेतून आमचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी आमच्या कुटुंबाचे भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते कायम राहिले. त्यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकणार नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


डॉ. पाटील यांच्या कार्याची खरी पोचपावती म्हणजे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कालपासून लाखोंच्या संख्येने उमटलेला जनसागर होय. सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या, माणुसकी जपणाऱ्या आणि प्रेमाने सर्वांना जोडणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाविषयी जनतेच्या मनात असलेला आदर यावरून स्पष्ट होतो, असेही शिंदे म्हणाले. डॉ. डी. वाय. पाटील यांचे एक वाक्य कायम स्मरणात राहील, असे सांगत शिंदे म्हणाले, "मोठी स्वप्ने पाहा; पण ती स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पाहा." या एका विचारातून त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रत्यय येतो. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण