Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. परिवहन विभागाने चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत 15 ऑगस्ट रोजी संपणार असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 18 ऑगस्टपासून मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर विशेष पथकांमार्फत कारवाई होण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)


परिवहन विभागाच्या माहितीनुसार, या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 18 हजार रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू असून चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेले सोपे मराठी शिकवले जात आहे. (Mumbai News)


सुरुवातीला तयार करण्यात आलेला 200 पानांचा अभ्यासक्रम बदलून आता केवळ दोन पानांचा सोपा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यात प्रवाशांशी होणाऱ्या दैनंदिन संवादासाठी उपयुक्त शब्द आणि वाक्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Taxi Drivers)



या प्रशिक्षणासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. चालकांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या चालकांना परिवहन विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. (Marathi Bhasha)


या प्रशिक्षण मोहिमेचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार आहे. त्यानंतर 18 ऑगस्टपासून विशेष पथके रस्त्यावर उतरून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Autoo Drivers)



परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी 1 मेपासून हा नियम लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर चालकांना मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. आता ही मुदत संपत असल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Marathi Training)


Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.