West Bengal : पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपाध्यक्ष आशिष बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात उचलले टोकाचे पाऊल

रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांनी आत्महत्या केली. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आढळला. कार्यालयातून एक चिठ्ठी पण जप्त करण्यात आली आहे. ही आत्महत्या करण्याआधी आशिष बॅनर्जी यांनीच लिहून ठेवल्याचा संशय आहे. पोलीस आशिष बॅनर्जी यांच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहेत.



चिठ्ठीतले अक्षर आशिष बॅनर्जी यांचेच आहे का हे तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी बॅनर्जींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अद्याप आशिष बॅनर्जींनी टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समजलेले नाही.



आशिष बॅनर्जी रामपूरहाट विधानसभा मतदारसंघातून २००१ ते २०२६ दरम्यान सलग पाच वेळा निवडून आले. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना आशिष बॅनर्जी यांनी विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. याआधी काही काळ ते पश्चिम बंगालमध्ये कृषिमंत्री होते. त्यांनी ममता बॅनर्जी सरकारमध्ये राहून वेगवेगळ्या खात्यांचा कारभार हाताळला होता. पण २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपच्या ध्रुबा साहा यांना एक लाख ११ हजार ९२० मते मिळाली तर आशिष बॅनर्जी यांना ८७ हजार ६८७ मते मिळाली. यामुळे २४ हजार २३३ मतांचा फटका बसला आणि आशिष बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीचा वेग एकदम मंदावला. मागील काही दिवसांपासून ते पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करून काही काळ फक्त कार्यकर्ता म्हणून काम करण्यास इच्छुक होते. यामुळेच अचानक काय घडले ज्यामुळे आशिष बॅनर्जी यांनी पक्ष कार्यालयातच टोकाचे पाऊल उलचले याचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण