Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सामूहिक रजा घेत आंदोलन केले. यामुळे चंदीगडमधील पंजाब राज्य सचिवालयातील कामकाज ठप्प झाले. कर्मचाऱ्यांनी सरकारकडे महागाई भत्ता देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे एक पथक जालंधरहून रवाना झाले. (Punjab)


दरम्यान, या आंदोलनावरून काँग्रेसने मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या सरकारवर टीका केली. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वॉरिंग यांनी दिला.



दुसरीकडे, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, संप सुरू ठेवून चर्चा होऊ शकत नाही. आधी संप मागे घ्या, त्यानंतरच सरकार चर्चा करेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे महागाई भत्त्याच्या मागणीवरून पंजाब सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Punjab)

Comments
Add Comment

Vande Bharat Export: फ्रान्स, जर्मनी आणि युएसमध्येही धावणार वंदे भारत! रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

[caption id="attachment_1071383" align="aligncenter" width="800"] वंदे भारत ट्रेनमध्ये चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे भारतीयांमध्ये या ट्रेनमधून प्रवास

Train Coaches Without Engine: रेल्वेचे 7 डब्बे विना इंजिनशिवायचं 6 किमीपर्यंत धावले! बंगळूरु -चेन्नई रेल्वेसेवा विस्कळीत; गेटमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

Train Coaches Without Engine: तामिळनाडू येथील तिरूपत्तर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वेच्या सुरक्षितेतील

Gold Purity Check: सोने खरे की खोटे? 5 स्टेप्समध्ये करा शुद्धतेची पडताळणी!

भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला विशेष महत्त्व आहे. सण-उत्सव, लग्नसराई किंवा धनत्रयोदशीसारख्या शुभ मुहूर्तावर

Punjab Politics : पंजाबमध्ये 'आप'ला मोठा हादरा; एकाच दिवशी ३ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, भगवंत मान सरकारपुढील अडचणी वाढल्या

चंदीगड : पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) तीन

Murasu Cyclone : 'मुरासू' चक्रीवादळ आज रात्री उशिरा रौद्र रूप धारण करणार; हवामान विभागाचा इशारा

Murasu Cyclone : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर

Cyclone Murasu : मुरासू चक्रीवादळाचा 'या' राज्याला धोका ! ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे, किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

Cyclone Murasu : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा