Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. साखळी क्रमांक ४४७ ते ४७०, म्हणजेच हडस पिंपळगाव ते माळीवाडा दरम्यानची सुमारे ३० किलोमीटरची वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली आहे. (Samruddhi Expressway Traffic Diversion)


आज सायंकाळी सुमारे ५ वाजता टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. (Samruddhi Expressway Traffic Diversion)



मुंबईकडून जाणारी वाहतूक :


मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावरून उतरून धुळे-सोलापूर महामार्गावरून माळीवाडा येथे पुन्हा समृद्धी महामार्गावर प्रवेश करतील. (Samruddhi Expressway Traffic Diversion)



नागपूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग :


नागपूरकडून येणारी वाहने माळीवाडा इंटरचेंजवरून धुळे-सोलापूर महामार्गावर वळविण्यात येतील आणि हडस पिंपळगाव येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर प्रवेश करतील. खबरदारीच्या दृष्टीने वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली. (Samruddhi Expressway Traffic Diversion)


दरम्यान, गेल कंपनीच्या तज्ज्ञांनी गॅस वाहिनीच्या दोन्ही बाजूंचे व्हॉल्व्ह बंद केले असून, पाइपलाइनमधील दाब कमी होत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (Samruddhi Expressway Traffic Diversion)



अधिक माहितीसाठी नागरिकांनी समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाच्या 1800 233 22 33 किंवा 8181818155 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Samruddhi Expressway Traffic Diversion)

Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड