नवी दिल्ली : दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरात स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसचा चालक आणि वाहकाला अटक केली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली बसही ताब्यात घेण्यात आली आहे. ही घटना 4 ऑगस्टच्या रात्री घडल्याची माहिती आहे. (New Delhi Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, 11वीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातून नोएड्यात राहणाऱ्या तिच्या चुलत भावाला भेटण्यासाठी निघाली होती. प्रवासादरम्यान मुसळधार पावसामुळे ती चुकून परी चौक येथे उतरली. त्यानंतर मदतीच्या शोधात असताना तिला रस्त्याच्या कडेला एक स्लीपर बस दिसली. तिने बसमधील चालक आणि वाहकाकडे मदत मागितली. (Crime News)
पोलिसांच्या माहितीनुसार, चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांनी तिला बसमध्ये येण्यास सांगितले. मात्र, बसमध्ये गेल्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला धमकावून काश्मिरी गेट परिसरात सोडून देण्यात आले. (Gang Rape News)
Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी
शामली : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन संशयितांची पोलिसांशी चकमक झाली. ...
घाबरलेल्या विद्यार्थिनीने काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तिमारपूर परिसरातील बस पार्किंगमधून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संबंधित स्लीपर बसही जप्त केली असून तिची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. (Delhi Police)
चौकशीदरम्यान आरोपींनी दिल्लीत विद्यार्थिनीला सोडल्यास पोलिसांच्या हाती लागणार नाही,
असा त्यांचा समज असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Rape News)
या घटनेमुळे 2012 मधील दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्या प्रकरणातही एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक अत्याचार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ( Minor Girl Case)