
नाशिक कुंभमेळा 21 महिने असणार
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा यावेळी 21 महिन्यांचा असणार आहे. कुंभमेळ्याची सुरूवात 31 ऑक्टोबर 2026 पासून होईल आणि त्याची सांगता 24 जुलै 2028 रोजी होणार आहे. जवळपास दोन वर्षे हा सोहळा चालणार आहे.
नाशिक कुंभमेळा ध्वजारोहण
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहण दोन स्थानी केलं जातं. नाशिकच्या रामकुंड घाट आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडाजवळ ध्वजारोहण होते. त्यासाठी या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे एकाच वेळी ध्वजारोहण केलं जाणार आहे.






