मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा तीव्र झाले आहेत. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, “महाराष्ट्रातील माफियागिरी संपवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तुमच्यासारख्या माफियांचा कर्दनकाळ होत महाराष्ट्र माफियामुक्त करण्याचे काम देवाभाऊंनी केले आहे.”
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावा ...
‘तुमच्या भोंग्याची हवा निघून गेली’ :
संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर टीका करताना बन यांनी म्हटले की, “संजय राऊत, तुमचा भोंगा सनईसारखा नाही, तुम्ही राहुल गांधींचा पोंगा वाजवण्याचे काम करत आहात.” फडणवीस यांनी राऊत यांच्या कथित ‘फेक नॅरेटिव्ह’चा भांडाफोड केला असून त्यांच्या आरोपांची हवा निघून गेल्याचा दावा बन (Navnath Ban) यांनी केला. फडणवीस यांनी राऊत यांच्या भूमिकेची चिरफाड केल्याचेही त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंवरही निशाणा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद असल्याचा दावा करत नवनाथ बन (Navnath Ban) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अभिजीत दीपके यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कथित वक्तव्यावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मोदींच्या फोटोवरून अमित ठाकरेंना आव्हान :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या मुद्द्यावरून बन (Navnath Ban) यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरही टीका केली. “छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला वंदनीय आहेत. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत,” असे सांगत मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांमध्ये तुलना करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले.
गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. ...
याच मुद्द्यावरून त्यांनी अमित ठाकरे आणि संजय राऊत यांना आव्हानही दिले. दादरमधील उबाठा गटाच्या भवनासमोर लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच मालेगाव महापालिकेत लावण्यात आलेल्या टिपू सुलतानच्या फोटोविरोधात आंदोलन का केले नाही, असा सवालही त्यांनी केला.
मतदार यादीच्या मुद्द्यावरूनही आरोप :
विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी मतदार यादीतील कथित दुबार नावांबाबत सादरीकरण केले होते, असा दावा बन यांनी केला. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदू मतदारांवर आक्षेप घेतल्याचेही त्यांनी म्हटले. संजय राऊत यांनी काही धर्माच्या लोकांना मतदार यादीतून वगळल्याचा आरोप केल्यास, “काही धर्माच्या म्हणजे कोणाच्या?” असा सवाल बन यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईतील मतदार यादीत रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांची कथित मते घुसवल्याचा आरोप करत, SIR प्रक्रियेला विरोध का केला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Navnath Ban)
दरम्यान, नवनाथ बन यांनी केलेले हे सर्व आरोप भाजपची राजकीय भूमिका म्हणून समोर आले असून, या आरोपांवर संजय राऊत किंवा संबंधित विरोधी पक्षांकडून पुढील प्रतिक्रिया काय येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Navnath Ban)




