Monday, August 31, 2026

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर २०२६ पासून मोठे बदल करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने सुधारित उपनगरी वेळापत्रक लागू केले असून प्रवाशांची गरज लक्षात घेऊन काही लोकलच्या फेऱ्या, मार्ग आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या वाढलेली नसून दररोज १,४१४ फेऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. (Western Railway New Timetable)

६ नव्या लोकल, ६ फेऱ्या रद्द :

नव्या वेळापत्रकानुसार अप दिशेला दोन आणि डाउन दिशेला चार अशा एकूण सहा नव्या धीम्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी सहा जुन्या लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. (Western Railway New Timetable)

नव्या लोकलच्या वेळा :

सकाळी ७.४६: भाईंदर ते विरार सकाळी ११.५८: वांद्रे ते चर्चगेट रात्री १०.१४: बोरिवली ते भाईंदर रात्री १०.५१: बोरिवली ते विरार रात्री ११.५१: विरार ते बोरिवली मध्यरात्री १२.२८: बोरिवली ते भाईंदर

या नव्या सेवांमुळे विशेषतः रात्री उशिरा विरार, नालासोपारा आणि भाईंदरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. (Western Railway New Timetable)

या ६ लोकल सेवा रद्द :

सुधारित वेळापत्रकात खालील सहा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत :

सकाळी ९.५६ — चर्चगेट ते बोरिवली सकाळी १०.५० — बोरिवली ते चर्चगेट सकाळी ११.०० — चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दुपारी १.१६ — चर्चगेट ते बोरिवली दुपारी २.३० — बोरिवली ते चर्चगेट रात्री ९.०१ — चर्चगेट ते मुंबई सेंट्रल एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन दोन नियमित लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. (Western Railway New Timetable)

सायंकाळी ५.२८: चर्चगेट ते बोरिवली — आता एसी लोकल सायंकाळी ६.२४: बोरिवली ते चर्चगेट — आता एसी लोकल

या बदलानंतर सोमवार ते शुक्रवार एसी लोकलच्या फेऱ्या १४५ वरून १४७ होणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी ११६ एसी लोकल फेऱ्या उपलब्ध राहतील.

डहाणूकरांना मोठा दिलासा :

डहाणू रोडच्या प्रवाशांसाठी नव्या वेळापत्रकातील महत्त्वाचा बदल म्हणजे दादर ते डहाणू रोड थेट लोकल सेवा सुरू होणार आहे. यापूर्वी दादर-विरार आणि विरार-डहाणू रोड अशा स्वतंत्र लोकल सेवांमुळे प्रवाशांना विरार येथे लोकल बदलावी लागत होती. आता या दोन सेवा एकत्र करण्यात आल्या आहेत. नवीन लोकल दादरहून सायंकाळी ५.२२ वाजता सुटेल आणि डहाणू रोडला सायंकाळी ७.३० वाजता पोहोचेल. (Western Railway New Timetable)

विरार-दादर लोकल आता थेट चर्चगेटपर्यंत :

सकाळच्या गर्दीच्या वेळेत विरारच्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. विरारहून सकाळी ८.२३ वाजता सुटणारी दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत धावणार आहे. ही लोकल सकाळी ९.४८ वाजता चर्चगेटला पोहोचेल. त्यानंतर चर्चगेटहून सकाळी ९.५२ वाजता सुटणारी लोकल नालासोपारापर्यंत धावणार आहे. (Western Railway New Timetable)

दोन जलद विरार लोकलचा बोरिवली थांबा रद्द :

गर्दीच्या वेळेत चर्चगेट-विरार जलद लोकलमध्ये बोरिवली स्थानकावर मोठी गर्दी होत असल्याने दोन सेवांचा बोरिवली थांबा रद्द करण्यात आला आहे. चर्चगेटहून सायंकाळी ६.२२ आणि ७.०५ वाजता सुटणाऱ्या दोन जलद विरार लोकल आता बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या नियमित प्रवाशांनी १ सप्टेंबरपासून प्रवास करण्यापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Western Railway New Timetable)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा