पुणे : मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास तयार असते, याचं प्रेरणादायी उदाहरण पुण्यात समोर आलं आहे. ४७ वर्षीय रामाबाई रणवीर यांनी आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी चक्क अनवाणी ३ किलोमीटर धावत शर्यत जिंकली. विशेष म्हणजे, आयुष्यात पहिल्यांदाच त्या धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. (Ramabai Ranvir)
रामाबाई यांना शर्यत म्हणजे नेमकं काय, याचीही कल्पना नव्हती. शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला ३ हजार रुपये बक्षीस मिळणार असल्याचं त्यांना समजलं आणि मुलींच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील या विचाराने त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. (Ramabai Ranvir)
शर्यतीसाठी घेतला अचानक निर्णय :
रामाबाई बीड येथील ज्ञानदीप अकादमीत स्वयंपाकघरात काम करतात. त्या दररोज २०० हून अधिक पोळ्या बनवतात आणि त्यांना महिन्याला ९ हजार रुपये पगार मिळतो. पतीच्या निधनानंतर २०१२ पासून त्या आपल्या दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी एकट्याने सांभाळत आहेत. २८ ऑगस्ट रोजी त्यांची धाकटी मुलगी आरती (२०) हिने फोन करून जेवण आणि घरभाड्यासाठी पैसे मागितले. मात्र, रामाबाईंकडे त्यावेळी देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्या रात्रभर चिंतेत होत्या. (Ramabai Ranvir)
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा; डिसेंबरमध्ये बीडला मुंबईशी जोडणी मुंबई : बहुप्रतिक्षित 'बीड-पुणे' रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी ...
दुसऱ्या दिवशी पहाटे अकादमीचे प्रशिक्षक पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना जवळच होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेसाठी घेऊन जात असल्याचं त्यांना समजलं. त्याच क्षणी त्यांनीही शर्यतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. (Ramabai Ranvir)
चप्पल तुटली, पण जिद्द कायम राहिली!
रामाबाई यांनी ना धावण्याचा सराव केला होता, ना त्यांच्याकडे स्पोर्ट्स शूज होते. त्या साडी नेसूनच शर्यतीसाठी उतरल्या. धावताना त्यांची चप्पलही तुटली. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. चप्पल बाजूला काढून त्यांनी अनवाणी ३ किलोमीटर अंतर पूर्ण केलं. शर्यत जिंकण्यासाठी त्यांच्या मनात केवळ एकच विचार होता मुलींच्या शिक्षणासाठी पैसे मिळवायचे. (Ramabai Ranvir)
३ हजारांच्या ऐवजी मिळाले ५ हजार!
रामाबाई यांनी ३० वर्षांवरील गटात शर्यत जिंकली. आयोजकांनी त्यांच्या जिद्दीने प्रभावित होऊन त्यांना अपेक्षित ३ हजार रुपयांऐवजी ५ हजार रुपयांचं बक्षीस दिलं. या पैशांतून त्यांनी मोठी मुलगी पूजासाठी वह्या-पेन खरेदी केले, तर उरलेले पैसे धाकटी मुलगी आरतीच्या शिक्षणासाठी ठेवले. (Ramabai Ranvir)
मोठ्या मुलीनेही मिळवलं बक्षीस :
रामाबाईंची मोठी मुलगी पूजा (२२) हिनेही १८ ते ३० वयोगटातील शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवत २ हजार रुपयांचं बक्षीस जिंकलं. ज्ञानदीप अकादमीचे प्रमुख दत्ता दराडे यांनी रामाबाईंच्या जिद्दीचं कौतुक केलं. अकादमीने पूजाला मोफत प्रवेश देण्यासोबतच रोजगार आणि राहण्यासाठी खोलीची सुविधाही दिली आहे. (Ramabai Ranvir)
Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड गावाजवळ हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने ...
‘मुलांसाठी जिंकणं हाच एकमेव विचार होता’ :
रामाबाई म्हणाल्या की, मुलांची काळजी घेता न येण्यापेक्षा मोठं दुःख दुसरं कोणतंही नाही. शर्यतीबद्दल समजताच ती जिंकायची, एवढाच विचार त्यांच्या मनात होता. त्यांची धाकटी मुलगी आरतीही आईच्या या जिद्दीने भारावून गेली. रामाबाईंचं शिक्षण केवळ सातवीपर्यंत झालं आहे. आयुष्यभर कष्ट करूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कधीही हार मानली नाही. स्वतःची परिस्थिती कठीण असतानाही त्यांनी आरतीला नांदेडला शिक्षणासाठी पाठवलं.
रामाबाईंची ही कहाणी केवळ एका शर्यतीची नाही, तर आईच्या मायेची, संघर्षाची आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीही करण्याच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे. (Ramabai Ranvir)