मुंबई : नेपाळमधील महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेवर अडकलेले कैलास मानसरोवर यात्रेतील ५४ भारतीय भाविक अखेर सुखरूप मुंबईत दाखल झाले. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
यावेळी शिवसेनेचे सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाविकांचे स्वागत केले. मिठाई भरवून आणि गुलाबपुष्प देत शेवाळे यांनी भाविकांशी संवाद साधला. भाविकांनी महाराष्ट्र शासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांचे आभार मानले.
पुणे : अजित पवारांच्या अपघातावर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) भावुक; म्हणाल्या, ‘याचं राजकारण करू नका’"अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात जी पोकळी ...
२२ ऑगस्टला कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेला हा ५४ जणांचा समूह महापुरामुळे सीमेवर अडकला होता. माहिती मिळताच राहुल शेवाळे यांनी भाविकांशी संपर्क साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे भाविकांना धीर दिला. महाराष्ट्र सरकार, भारतीय दूतावास आणि नेपाळ दूतावासाच्या समन्वयातून विशेष व्यवस्था करून भाविकांना काठमांडू येथे आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी विमानाने त्यांची सुखरूप मुंबईत घरवापसी झाली.
बंगळूर : पोलीस उपआयुक्त (इलेक्ट्रॉनिक सिटी विभाग) नारायण एम. यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बंगळूर ...
"माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने नेपाळमध्ये विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. महापुरामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना या कक्षाच्या माध्यमातून सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. ५४ भाविकांचा हा ग्रुप मुंबईत येईपर्यंत आम्ही सर्वजण त्यांच्या संपर्कात होतो. हा क्षण म्हणजे शिवसेनेचा समाजकार्याचा वसा अधोरेखित करणारा क्षण आहे" - राहुल शेवाळे, शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार
"वास्तविक, इतक्या प्रलयंकारी महापुरातून आम्ही वाचलो, यासाठी ईश्वराचे आभार मानतो! आणि या कठीण प्रसंगात आमच्याशी संपर्क साधून आम्हाला धीर दिल्याबद्दल आणि परत मुंबईत येण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारची मदत केल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आम्ही ५४ जण त्यांचे सदैव ऋणी राहू" - संजय सावंत, भाविक






