Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात आता खरे मुखवटे समोर येतील!

- मंत्री नितेश राणे; भगिनीला न्याय मिळाला याचा आम्हाला आनंदच


मुंबई : दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले. ‘‘पहिल्या दिवसापासून आम्ही हा विषय राज्यासमोर आणला. आता न्यायालयीन प्रक्रियेतून या प्रकरणाची सत्यता समोर येईल. टप्प्याटप्प्याने या प्रकरणातील खरे चेहरे आणि मुखवटे राज्य आणि देशासमोर येतील,’’ अशी प्रतिक्रिया राणे (Nitesh Rane) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.


दिशा सालियन यांचा मृत्यू जर आत्महत्या असेल, तर या प्रकरणात एवढी धावपळ का करण्यात आली, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. ‘‘जर खरंच ही आत्महत्या होती, तर न्यायालयात काल जे पुरावे दाखल झाले किंवा काही लोकांना वाचविण्यासाठी जी धावपळ झाली, काही पुरावे नष्ट केले गेले, काही साक्षीदारांना गायब करण्यात आले किंवा धमकावण्यात आले, असे आरोप का झाले?’’ असा प्रश्न त्यांनी (Nitesh Rane) उपस्थित केला.



आपल्यासह माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावरही चुकीच्या पद्धतीने प्रकरणे दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला. ‘‘आमच्यासारख्या लोकांवर खोट्या केसेस टाकून दबाव आणण्याचा जो प्रयत्न केला, तो कोणासाठी होता? कोणाला वाचवायचे होते? एका तरुणीने आत्महत्या केली असेल आणि हा विषय एवढा सरळ-स्पष्ट असेल, तर ते प्रकरण लपविण्यासाठी एवढी धावपळ कशासाठी? संपूर्ण महाविकास आघाडीचे सरकार हे का करत होते? न्यायालयातील कालच्या घडामोडींमुळे या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता तुम्ही टप्प्याटप्प्याने पाहाल. जे स्वतःला वाचवत इकडून तिकडे पळत होते आणि गोंडस चेहरा घेऊन फिरत होते, त्यांचे खरे मुखवटे राज्यासमोर आणि देशासमोर येतील,’’ असे राणे (Nitesh Rane) म्हणाले.


मात्र, या संपूर्ण प्रकरणात आपला मुख्य मुद्दा राजकारण नसून दिशाला न्याय मिळणे हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘‘त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तिच्या वडिलांची रोजची धावपळ तुम्ही पाहत असाल, त्यांच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी ते करत असलेला पाठपुरावा पाहत असाल. माझ्या एका बहिणीला न्याय मिळत असेल, यापेक्षा समाधानाची गोष्ट काय असू शकते?’’ असे राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले.



दिशा सालियन प्रकरणाचा आतापर्यंत ज्या हिरिरीने पाठपुरावा केला, तो पुढेही सुरू ठेवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता राणे म्हणाले, ‘‘आता कोर्टामध्ये केस सुरू आहे. सीबीआय त्याचा तपास करणार आहे. आम्ही जे सहकार्य करायचे होते ते केले आहे. आमच्याकडे जी माहिती आणि पुरावे होते, ते आमच्या पद्धतीने दिले आहेत. आता कायद्याला त्याचे काम करू द्या,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. (Nitesh Rane)



नियम फक्त हिंदू सणांसाठी का?


- दरम्यान, गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावरूनही राणे यांनी प्रश्न उपस्थित केला. पुण्यात डीजे वाजवावा की नाही आणि उत्सवांचे स्वरूप कसे असावे, यावर चर्चा सुरू असताना, डीजेचा मुद्दा फक्त हिंदू सणांच्या वेळीच का उपस्थित केला जातो? असा सवाल त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या वेळी डीजेचा विषय निघतो. पण गेल्या आठवड्यात ईद झाली. रात्री २ वाजेपर्यंत डीजे वाजत होते. मग सगळे सल्ले आणि मार्गदर्शन फक्त हिंदू सणांनाच का?’’ असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याची भूमिका घेतली असून, ती चांगली असल्याचेही राणे म्हणाले. मात्र, ‘‘हिंदूंना ईदच्या वेळी त्रास होत नाही का? डीजेचे प्रकार वेगळे असतात का? आम्हालाही जरा ती टेक्नॉलॉजी समजवा,’’ अशी उपरोधिक टिप्पणी राणे यांनी केली.
- ‘‘हिंदू म्हणून आम्ही सगळे नियम पाळतो. उच्च न्यायालयाने रात्री १० वाजेपर्यंतची जी स्पीकरबाबतची मर्यादा घातली आहे, त्यानुसार ९ वाजून ५९ मिनिटांनी सगळे बंद करतो. कधीच कुठले नियम तोडत नाही. परंतु, एकाच्या बाबतीत जे चुकीचे असेल, ते दुसऱ्याच्या बाबतीत योग्य कसे असेल?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
- ‘‘कधी कुठल्या हिंदूने ईद किंवा मोहरमच्या जुलूसमध्ये दगड किंवा चप्पल मारली, असे एक उदाहरण कोणीही मला द्यावे. त्यावर स्टोरी करण्याची संधी तरी आपल्याला मिळते का?’’ असा सवाल त्यांनी मुलाखतीदरम्यान उपस्थित केला. (Nitesh Rane)




Comments
Add Comment

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.