मुंबई : कधी पाऊस पडणार ? कधी उकाड्याचा त्रास होणार ? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आता आणखी सोपं झालंय. गूगलने (Google) हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी वेदरनेक्स्ट ३ (WeatherNext 3 AI) हे नवे एआय मॉडेल तयार केले आहे. वेदरनेक्स्ट ३ एआय भूस्थिर उपग्रहांकडून मिळालेल्या डेटाचा वापर करून एचडी इमेजच्या स्वरुपात हवामानाचा अंदाज वर्तवणार आहे.
मुंबई : ॲपल कंपनी बुधवार नऊ सप्टेंबर रोजी आयफोन १८ प्रो, आयफोन १८ प्रो मॅक्स आणि आयफोन फोल्ड हे तीन नवे मोबाईल लाँच करणार आहे. आयफोन फोल्ड हा आयफोन ...
आतापर्यंतचे सर्वात प्रगत आणि अचूक जागतिक हवामान मॉडेल तयार केल्याचा दावा गूगलने (Google) वेदरनेक्स्ट ३ एआय (WeatherNext 3 AI) लाँच करताना केला आहे. हे मॉडेल रिअल टाइम डेटा देणार आहे. यासाठी वेदरनेक्स्ट ३ एआय हे गूगल सर्च, जेमिनी, गूगल मॅप्स, गूगल मॅप्स प्लॅटफॉर्म आणि गूगल अर्थ इंजिन या सर्व प्लॅटफर्मशी समन्वय साधणार आहे.
दुबई : महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत आधीच उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतर भारतीय महिला संघ आता आपल्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या ...
गूगलचे मॉडेल तापमान आणि आर्द्रता यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा ५ किलोमीटरच्या रिझोल्यूशनवर अचूक अंदाज लावू शकते. याव्यतिरिक्त, जमिनीवरील माहिती १० किलोमीटरच्या रिझोल्यूशनवर उपलब्ध आहे, तर वाऱ्याच्या वेगासारख्या वातावरणीय घटकांचा मागोवा २५ किलोमीटरच्या रिझोल्यूशनवर घेतला जाऊ शकतो. वेदरनेक्स्ट ३ सर्व भूस्थिर उपग्रहांच्या डेटाची मदत घेऊन विश्लेषण करणार आहे. तसेच दर तासाला डेटा अपडेट करणार आहे. यामुळे हवामानाविषयी ताजी माहिती मिळवणे सोपे होणार आहे. वेदरनेक्स्ट ३ एआय पर्वत, दऱ्या आणि समुद्रकिनारे यांसारख्या स्थानिक घटकांचा विचार करण्यासाठी जमिनीवरील हवामान केंद्रांमधील डेटाचाही वापर करणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वयाची खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदी सादर केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक ...
चाचणीदरम्यान नासाच्या IMERG पेक्षा ६० टक्के, MRMS पेक्षा ३० टक्के आणि पर्जन्यमापक नोंदींपेक्षा दहा टक्के जास्त अचूकतेने अंदाज वर्तवण्यात वेदरनेक्स्ट ३ एआय यशस्वी झाले आहे. यामुळे गूगलच्या वेदरनेक्स्ट ३ एआय चा नागरिकांना फायदा होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. गूगलचे वेदरनेक्स्ट ३ एआय १०० मीटर उंचीवरील वाऱ्याचा वेग, ढगांची स्थिती आणि सौर किरणोत्सर्गाचा अचूक अंदाज लावू शकते. यामुळे पवन आणि सौर प्रकल्प चालकांना ते किती वीज निर्माण करू शकतात हे ठरविण्यास मदत होईल.
नवी दिल्ली : हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हथनीकुंड बॅरेज येथे सराव सुरू असताना एक अपघात झाला. या अपघातामुळे यमुनेच्या प्रवाहात वाहून गेल्याने ...
वेदरनेक्स्ट ३ गूगलच्या ॲप्स आणि सेवांमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर उद्याच्या किंवा परवाच्या अथवा तेरवाच्या हवामानाचा अंदाज आज घेतला तरी किमान ५० टक्के अचूक अंदाज आधीच मिळेल असे आतापर्यंतच्या चाचण्यांतून आढळले आहे. यामुळे वेदरनेक्स्ट ३ सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.