Bihar : जन्माष्टमीचा सण म्हटलं की, घराघरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. अनेक पालक आपल्या मुलांना लाडक्या कान्हाच्या वेशभूषेत सजवतात. मात्र, बिहारच्या रोहतास जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने जन्माष्टमीच्या आनंदावर शोककळा पसरली आहे. रोहतास (Rohtas) जिल्ह्यातील भागीरथ गावात राहणाऱ्या विमलेश यादव यांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलाला आर्यन यादवला कृष्णाच्या वेशभूषेत सजवलं होतं. पिवळे कपडे, गळ्यात मण्यांची माळ आणि कृष्णासारखा केलेला साज पाहून कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र, काही वेळातच या आनंदाचं रूपांतर मोठ्या दुःखात झालं.
Rain Update : सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार, तर काही भागांमध्ये मध्यम ते ...
गळ्यातील माळेतील मणी गिळला
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनच्या गळ्यात घातलेल्या माळेतील एक मणी त्याने गिळला. त्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडू लागली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आर्यनला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झाला. आर्यन हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या मुलाला कान्हाच्या रूपात पाहून ज्या घरात आनंदाचं वातावरण होतं, त्याच घरावर काही वेळातच दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी आपल्या मुलाला आनंदाने कृष्णाच्या वेशभूषेत सजवलं होतं. मात्र, गळ्यात घातलेली मण्यांची माळच त्याच्यासाठी जीवघेणी ठरली.
नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये (Operation Sindoor) मिळालेल्या प्रचंड यशानंतर भारताने रशियाकडून आणखी पाच 'एस-४०० ट्रायम्फ' (S-400 Triumf) हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी ...
पालकांसाठी महत्त्वाचा धडा
या घटनेनंतर लहान मुलांना सणासुदीच्या काळात सजवताना सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मुलांच्या गळ्यात मण्यांच्या माळा, हार, छोटे दागिने किंवा सहज तोंडात जाऊ शकतील अशा लहान वस्तू घालताना पालकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. लहान मुलं खेळताना किंवा नकळत अशा वस्तू तोंडात घालू शकतात आणि त्यामुळे गुदमरल्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, जन्माष्टमीचा दिवस आपल्या मुलासाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय बनवण्याचा आर्यनच्या कुटुंबाचा प्रयत्न होता. मात्र, एका छोट्याशा मण्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस कधीही न भरून येणाऱ्या दुःखात बदलला.



