अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक पिंकी वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. शिरजगाव कसबा परिसरात एका शेतकऱ्यावर हल्ला केल्यानंतर ही वाघीण त्याच ठिकाणी बराच वेळ बसून होती. वनविभागाच्या पथकाने योग्य संधी साधत वाघिणीला बेशुद्ध करून सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. पिंकी वाघीण जेरबंद झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील विविध भागांत या वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. शिरजगाव कसबा येथे वाघिणीने हल्ला करत दामू भाऊ आवारे या शेतकऱ्याचा जीव घेतला. यापूर्वी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवरही तिने हल्ला केला होता, या घटनेत तिचा मृत्यू झाला.
पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडोरच्या (Pandharpur Corridor) कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. नुकताच या ...
पिंकी वाघिणीने मागील काही दिवसांपासून एकूण ४ जणांचा जीव घेतला होता. त्यामुळे गावामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं. या वाघिणींनी चार जणांचा बळी घेतला असून अनेक बकऱ्या आणि गाईंचाही जीव घेतला. होता. त्यामुळे वनविभागाने वाघिणीचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली होती. पिंकी वाघिणीच्या हल्ल्यात राजाभाऊ भोयर (शेतकरी आष्टी, जिल्हा वर्धा) चरणदास विखे (भांबोरा तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती) उर्मिला बाजीराव इवने ( वय 22, सोनोरी, ता .चांदुर बाजार जिल्हा अमरावती) आणि दामू भाऊ आवारे (शिरजगाव कसबा, जिल्हा अमरावती) या चार जणांना ठार मारलं होतं.
एकापाठोपाठ ४ जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक पिंकी वाघिणीला जेरबंद करा किंवा गोळ्या घालून ठार मारा, अशी मागणी माजी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. तसंच भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनीही वन विभागाला धारेवर धरलं होतं. तातडीने या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करा, अशी मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली होती. पिंकी वाघिणीच्या दहशतीमुळे नागरिक पूर्णपणे भयभीत झाले होते, शेतातील कामं ठप्प झाली होती. लोक घराबाहेर पडण्यासाठी घाबरत होती, इतकी दहशत या वाघिणीची झाली होती.
मुंबई : जागतिक बाजारातील घडामोडी आणि पुरवठा साखळीतील बदलांचा परिणाम देशातील गॅस वितरण आणि दरांवर होत असतो. ग्राहकांच्या गरजा तसेच बाजारातील ...
अखेरीस वन विभागाच्या कर्मचारी आणि टीमने शिरजगाव कसबा परिसरात जाळं पसरवलं, याच भागात पिंकी वाघिणीने शेतकऱ्याला ठार मारलं होतं. पुन्हा ती याच भागात आली होती याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी पोहोचले. अखेरीस वाघिणीला डार्ट करण्यात यश आलं रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे येथील मुख्य पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. हेमराज यांनी वाघिणीला यशस्वीपणे डार्ट करून बेशुद्ध केलं.
पिंकी बेशुद्ध झाल्यामुळे लगेच तिला जेरबंद करण्यात आलं. वाघिणीला जेरबंद केल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. घटनेची माहिती मिळताच माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार प्रवीण तायडे घटनास्थळी दाखल झाले आहे. ही पिंकी वाघीण वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.





