Nitesh Rane on Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणाशी संबंध नसेल तर आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका का दाखल केली ? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

तत्कालीन महापौरांनी दिशाच्या आईवडिलांना धमक्या दिल्या


मुंबई : दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणाशी जर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा कोणताही संबंध नसेल, तर ते वकिलांमार्फत हस्तक्षेप याचिका का दाखल करतात? सुनावणीवेळी त्यांचे वकील न्यायालयात का उपस्थित राहतात, असा सवाल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी उपस्थित केला. तसेच तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिशा सालियन यांच्या आई-वडिलांना धमक्या का दिल्या, असा मुद्दाही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.


दिशा सालियन प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होत असून या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना राणे यांनी, ‘संबंधच नसेल तर त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात हस्तक्षेपासाठी प्रतिज्ञापत्र का दाखल केले ?’ असा सवाल केला. प्रत्येक सुनावणीच्या वेळी आदित्य ठाकरे यांचे वकील न्यायालयात का उपस्थित राहतात? महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणात ‘लपवाछपवी’ का करण्यात आली? दिशा सालियन यांच्या आई-वडिलांना शवविच्छेदनाचा अहवाल तत्काळ का मिळाला नाही? तसेच तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या आई-वडिलांना धमक्या का दिल्या? या सर्व बाबींचे उत्तर द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.



या प्रकरणात आता ‘पळवाटा संपल्या असून सर्व दरवाजे बंद झाले आहेत’, असे सांगत राणे यांनी सीबीआयच्या पुढील तपासात सर्व बाबी स्पष्ट होतील, असा दावा केला. ‘आता एफआयआर दाखल होईल, चौकशी होईल आणि दूध का दूध, पाणी का पाणी होईल,’ असे ते म्हणाले. राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत वकील निलेश ओझा यांनी यापूर्वी केलेल्या एका आरोपाचाही उल्लेख केला. रिया चक्रवर्ती यांच्याशी संबंधित ‘चॅट’मध्ये आदित्य ठाकरे यांच्याबाबत अमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात उल्लेख असल्याचा आरोप ओझा यांनी केल्याचे राणे म्हणाले. आंदोलन किंवा सार्वजनिक कार्यक्रमापूर्वी आदित्य ठाकरे यांची अमली पदार्थ चाचणी करण्याची मागणीही त्यांनी केली.


दरम्यान, भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, ठाकरे कुटुंबीयांचा आणि जीडीपीचा काय संबंध, अशी उपरोधिक टिप्पणी राणे यांनी केली. यावेळी ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भातील प्रश्नावरही राणे यांनी भाष्य केले. सुरुवातीला काही ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार देण्यात आला असला, तरी आता त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक चित्रपटगृहे तो प्रदर्शित करण्यास उत्सुक असल्याचे राणे म्हणाले. हिंदुराष्ट्रात या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : गरब्यात मुस्लिमांना ‘नो-एन्ट्री’ - मंत्री नितेश राणे यांची भूमिका

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य असावे मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया

Maratha Reservation News : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री खलबते

- महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती; मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत झाली चर्चा मुंबई : मराठा आंदोलक मनोज

Jogeshwari Trauma Hospital : जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात खरेदी केलेली २५ कोटींची मशिन धुळखात

महापौर रितू तावडे यांनी या मशिनचा त्वरीत वापर करण्याचे दिले निर्देश महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही

Garib Nagar : गरीब नगरमधील 100 झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर; सप्टेंबरअखेर पुनर्वसन पूर्ण करण्याचे MMRDAचे नियोजन

मुंबई :  गरीब नगरमधील पात्र कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वांद्रे पूर्व येथील गरीब नगर

College Admission : ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई; इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच

Dadaji Bhuse : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

भौतिक सुविधा आणि संस्कारांवरही भर मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य