College Admission : ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई; इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक असून, मंजूर क्षमतेपेक्षा जास्त किंवा ऑफलाईन पद्धतीने अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार २०२५-२६ पासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. या प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढे इयत्ता १२ वीच्या राज्य मंडळाच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचणी निर्माण होतात. तसेच प्रवेश नियमित न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.(Maharashtra college admission)



या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालय तसेच मुख्याध्यापकांविरुद्ध महाराष्ट्र कर्मचारी खासगी शाळा (सेवेच्या शर्ती) अधिनियम, १९७७ व नियमावली, १९८१ मधील तरतुदींनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Dadaji Bhuse : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

भौतिक सुविधा आणि संस्कारांवरही भर मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य

School Material Distribution : शालेय साहित्य वाटपावर मोठं स्पष्टीकरण; वह्यांबाबतचा दावा फोल

शालेय वस्तूंच्या वाटपावरून विरोधकांचा फेल नॅरेटिव्ह सर्व साहित्यांचे वाटप शाळांमध्ये अंतिम

Vishakha Raut : उबाठाच्या विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर रद्द

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर

Recruitment Exam : भरती परीक्षांमध्ये मोठ्या सुधारणा होणार? सरकारचा उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यभर उमेदवारांशी थेट संवाद साधणार

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने

Mangal Prabhat Lodha : 'आयटीआय'च्या नामांतर प्रक्रियेतून पालकमंत्र्यांना वगळले; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे एकाधिकार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या

Central Railway : मध्य रेल्वेकडून कोकणवासीियांना मोठी भेट; CSMT-सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू

Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे