Tuesday, September 8, 2026

BJP News: भाजपाकडून अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, वाचा यादी...

BJP News: भाजपाकडून अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, वाचा यादी...
मुंबई: भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार काही वेळापूर्वीच अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कार्यकारिणी जाहीर केलेली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी ॲड. माधवी नाईक आणि अध्यक्ष विश्वजित गायकवाड यांनी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी अशोक उमरगेकर (पुणे), प्रा.पंडित सूर्यवंशी (लातूर), दिनेश पगारे (नाशिक) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.   सरचिटणीसपदी प्रा.रमा शेजवळ (परभणी), सुधीर जांभूळकर (नागपूर), परिमल कांबळे (अकोला), राहुल कांबळे (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी सिद्धार्थ वानखेडे (अमरावती), बबनराव नरवाडे (छ.संभाजीनगर), प्रणाली सावर्डेकर (रत्नागिरी) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण कांबळे (पुणे) यांची कोषाध्यक्षपदी तर सुरेश गायकवाड (नवी मुंबई) यांची कार्यालय मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
"निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या संघटनात्मक नेतृत्वातून अनुसूचित वर्गातील प्रत्येक घटकाचा आवाज अधिक बुलंद आणि समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. शिवाय, आपले संघटन कौशल्य आणि सेवाकार्यातून अनुसूचित जाती मोर्चाला अधिक बळ मिळेल.", असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. सोबतच, अनुसुचित जाती मोर्चाच्या जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणींनी नवीन जबाबदारीसाठी रविंद्र चव्हाणांकडून शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >