रेल्वे मालवाहतूक जाळे पूर्ण क्षमतेने सुरू
वडोदरा येथील भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या (Western Dedicated Freight Corridor ) अंतिम तीन टप्प्यांसह अनेक विकासकामांचे उद्घाटन झाले. या नव्या मार्गांमुळे आता पूर्व, उत्तर आणि पश्चिम भारताला जोडणारी देशातील मालवाहतूक रेल्वे यंत्रणा पूर्ण क्षमतेने आणि वेगाने कार्यरत झाली आहे. उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांनी पूर्वीच्या काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारवर कडाडून टीका केली. २००४ मध्ये मांडलेली ही योजना वर्षानुवर्षे केवळ लालफितीत आणि फाईल्समध्येच अडकून पडल्याचे त्यांनी सांगितले.
?si=EyADAr7Zva9ahVzX
'१० वर्षे फाईल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरल्या'
प्रकल्पाच्या दिरंगाईवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "२००४ मध्ये या प्रकल्पाची कल्पना सुचली आणि २००६ मध्ये कंपनी स्थापन झाली. आज उपस्थित असलेल्या अनेक तरुणांचा तर तेव्हा जन्मही झाला नसेल. मात्र, २००४ ते २०१४ या काळात फाईल्स फक्त एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत राहिल्या, प्रत्यक्ष काम काहीच झाले नाही."
'त्या संथ गतीने काम चालले असते तर पिढ्या उलटल्या असत्या'
मागील प्रशासनाच्या धोरणावर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, "सत्य परिस्थिती ही आहे की सुरुवातीच्या ७-८ वर्षांत १ किलोमीटरचा मार्गही तयार झाला नव्हता. जर देश त्याच धिम्या गतीने चालवला गेला असता, तर हा मार्ग पूर्ण व्हायला पुढील ३-४ पिढ्या वाट पाहावी लागली असती."
We are strengthening India's infrastructure to move people and goods faster, create new opportunities and power economic growth. Addressing a programme in Vadodara during the launch of key projects. https://t.co/JfapjA64fm
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2026
वेळेची बचत, इंधनाची बचत आणि वाहतुकीला वेग
२०,७०० कोटींचा भव्य प्रकल्प आणि नवे ३२६ किलोमीटर
या प्रकल्पातील ३२६ किलोमीटरचे तीन नवीन टप्पे सुमारे २०,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारण्यात आले आहेत. यामध्ये खालील महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे, न्यू साणंद नॉर्थ ते न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे, न्यू सफाळे ते न्यू जेएनपीटी (JNPT)
वडोदऱ्यात इतर तीन मोठ्या रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन
पंतप्रधानांनी वडोदरा येथे आणखी तीन महत्त्वाच्या रेल्वे कामांची पायाभरणी केली, वडोदरा-रतलाम मार्गावर तिसरी व चौथी रेल्वे लाईन, मियागाम करजण–चोरंडा–मालसर मार्गाचे रुंदीकरण (गेज परिवर्तन), विश्वामित्री–डभोई रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण (डबलिंग).
मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन
वडोदरामधील कार्यक्रम पूर्ण करून पंतप्रधान मोदी मुंबईकडे रवाना होतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६' (GFF) च्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.






