दिशा सालियनच्या (Disha Saliyan) कथित आत्महत्या प्रकरणाला आता एक नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानंतर केंद्रीय ...
मीरा- भाईंदरनंतर आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कृत्रिम तलावांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने गणेशोत्सवामध्ये १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. बेलापूर २२, नेरुळ २९, वाशी १६, तुर्भे २१, कोपरखैरणे १६, घणसोली १६, ऐरोली २५, दिघा २५ या परिसरांमध्ये कृत्रिम तलावांची महापालिकेकडून निर्मिती करण्यात आली आहे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मुर्त्यांचे आणि मोठमोठ्या मुर्त्यांचेही विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करण्याचे आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले आहे.
मुंबई: मुंबईमध्ये 'प्रकाशचित्रांतून लोक कलावंतांचे स्मृतीवंदन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ...
नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या घराजवळ असलेल्या सोयीस्कर पडत असणाऱ्या ठिकाणीच आपल्या गणेशमुर्तीचं विसर्जन करावं, असं आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनावेळी विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी होते. ही सर्व गर्दी विभागण्यासाठी पालिका प्रशासनाने नागरिकांना कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शहरातील नागरिकांना सोयीचे पडणाऱ्या ठिकाणी कृत्रिम तलावांसाठीची जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागाने निश्चित केली आहे, तलाव उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
कॉलनी ऑफीसरवरच नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप एसआरए अभय योजनेत कॉलनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील ...
पर्यावरणाचा समतोल राखत गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडूच्या आणि पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन सुद्धा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. विसर्जनस्थळांवर गणेशभक्तांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून आवश्यक व्यवस्था केली जात आहे. स्वयंसेवक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि &t=23s">सीसीटीव्हीची सुविधा देखील उपलब्ध केली जाणार आहे. निर्माल्य संकलन आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून तराफे, फोर्कलिफ्ट यांसारखी यंत्रसामुग्रीही सज्ज ठेवण्यात येणार आहे.