Pune News: पुण्यात अन्न- औषध प्रशासनाची मोठी कारवाई, ऐन सणासुदीच्या काळात पनीर- खवा जप्त

पुणे: सणासुदीच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आलेलं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या FDA कडून धडक कारवाई केली जात आहे. आता अशातच पुण्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून FDA ने चार ट्रक पनीर आणि खवा जप्त केला आहे. FDA ने केलेल्या ह्या बेधडक कारवाईची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. ह्या कारवाईमुळे राज्यातील दूध डेअरी चालकांचे चांगले धाबे दणाणले आहेत.



पुण्यातील बुधवार पेठेमध्ये झालेल्या कारवाईमध्ये FDA मधील मोठ्या प्रमाणावर अधिकारी वर्ग उपस्थित होता. FDA च्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यानंतर तात्काळ पोलिस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्त्रोताबाबत तपास सुरू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सणासुदीचे दिवस सुरू आहेत, याच पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई राबवली जात आहे. गणेशोत्सवात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रशासनाकडून भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



दरम्यान, FDA प्रशासनाने अलिकडेच नाशिक जिल्ह्यातही धडक कारवाई केली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोकणगावातील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्ट नावाच्या कंपनीवर कारवाई केली आहे. कंपनीने फ्रोजन कस्टर्ड ॲपल पल्प, मँगो पल्प आणि क्रीमरचा एकूण 6457 किलो साठा जप्त करत कारवाई केली आहे. अन्न- औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण 39 लाख 18 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न पदार्थ मिसळयुक्त आणि कमी दर्जाचे असल्याच्या संशयातून FDA प्रशासनाने कारवाई केली होती. दरम्यान, पदार्थांच्या लेबलवर Use by Date, Nutritional Information, Packing Date आणि FSSAI License Number न आढळल्यामुळे प्रोडक्ट्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती

&t=3s">एफडीए
कडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत द्या; ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी-चाऱ्याचे नियोजन करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या

महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे बजेट ५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य - मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी विभागाचे बजेट 212 कोटी

Devendra Fadnavis : 'महा कॅम्पा' निधीतून व्याघ्र प्रकल्पांतील गावांचे पुनर्वसन पूर्ण करा ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : व्याघ्र प्रकल्प आणि अन्य संरक्षित वनक्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे महाराष्ट्र पर्यायी वनीकरण

Eknath Shinde : 'शेतकऱ्याला छळाल तर तुरुंगात पाठवू’; बँका, पतसंस्था, विमा कंपन्या, मायक्रो फायनान्स आणि सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

नाशिक : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या बँका, पतसंस्था, विमा

राज्यातील दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रास वन्यजीव