Friday, September 11, 2026

Jalgaon Crime News : आईसोबत सतत बोलत असल्याचा राग अनावर, १७ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून ३५ वर्षीय तरुणाची हत्या

Jalgaon Crime News : आईसोबत सतत बोलत असल्याचा राग अनावर, १७ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून ३५ वर्षीय तरुणाची हत्या

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ३५ वर्षीय व्यक्ती आपल्या आईसोबत सतत बोलत असल्याचा राग मनात ठेवत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने धक्कादायक कृत्य केलं आहे. रागाच्या भरात मुलाने ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचे समोर आले आहे. बाजारपेठ पोलिसांन (Bazar Peth Police) संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तुषार सोनवणे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.(Bhusawal Crime News)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत तुषार सोनवणे हे भुसावळ येथील रेल्वे कँटीनमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांचा एका महिलेसोबत संपर्क व बोलणे होत असायचे मात्र महिलेच्या १७ वर्षीय ही गोष्ट पटत नव्हती. सोनवणे हे आपल्या आईसोबत सतत बोलत असल्याने संशयिताच्या मनात तुषार सोनवणे याच्याबाबत राग निर्माण झाला होता. अखेर मुलाचा राग अनावर झाला आणि गुरुवारी रात्री पाटील मळा परिसरात तुषार सोनवणे असताना संशयित अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर हल्ला केला असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. (Bhusawal Crime News)

१७ वर्षीय संशयित ताब्यात

हल्ल्यात सोनवणे गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत तसेच उपलब्ध पुरावे तपासून पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत १७ वर्षीय संशयिताला अखेर ताब्यात घेतले. सध्या या मुलाची चौकशी सुरु आहे. (Bhusawal Crime News)

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

दरम्यान, हत्येमागील नेमके कारण काय, घटनेपूर्वी मयत व संशयित यांच्यात काही वाद झाला होता का तसेच हल्ल्याचे स्वरूप याचा तपास केला जात आहे. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. तर संशयिताचे वय १७ वर्षे असल्याने त्याच्याविरुद्धची पुढील कायदेशीर प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेतील तरतुदींनुसार केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >