Minister Dattatray Bharne : राज्यावर दुष्काळाचे सावट ! - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; पुढील ३-४ दिवसांत अहवालानंतर कार्यवाही करणार

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पिके संकटात सापडली असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरलेली पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत. राज्यातील परिस्थितीचा अहवाल पुढील तीन-चार दिवसांत प्राप्त झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिली. तसेच कमी पाऊस झालेल्या भागांचा आपण पुढील आठवड्यापासून दौरा करणार असल्याचेही भरणे यांनी सांगितले


पुण्यात माध्यमांशी बोलताना भरणे म्हणाले की, जूनमध्ये पाऊस झाला नाही, जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला. पुणे, कोकण आणि ठाणे परिसराचा काही भाग वगळता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून कापूस आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी बैलपोळ्याच्या सणावरही परिणाम झाला असून शेतकरी नाराज असला तरी वर्षभर शेतकामात साथ देणाऱ्या बैलाची पूजा करण्याचे कर्तव्य म्हणून हा सण साधेपणाने साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आणि मजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांच्यासह काही आमदारांनी केली आहे. ही मागणी चुकीची नाही, असे सांगत भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचे अहवाल मागविण्याचे निर्देश दिल्याचे नमूद केले. तीन-चार दिवसांत अहवाल आल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले. कमी पावसाच्या परिस्थितीत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करेल, असे भरणे यांनी सांगितले. यापूर्वीच्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचे अनुभव फारसे चांगले नव्हते. मात्र, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले असल्यास त्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय सर्वांना मान्य


दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत विचारले असता, “सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल,” असे सूचक विधान भरणे यांनी केले. मुंढवा जमीन प्रकरणात युवा नेते पार्थ पवार यांच्याविषयी न्यायालयीन निरीक्षणांबाबत विचारले असता हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे भरणे यांनी सांगितले. या प्रकरणात पार्थ पवार यांचा काहीही संबंध नसावा, असे मत व्यक्त करतानाच या प्रकरणात सत्य समोर येईल, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

R Madhavan US Open : आर. माधवनने अनुभवला यूएस ओपनचा रोमांच; आर्थर ॲश स्टेडियमवर ठरला एकमेव भारतीय सेलिब्रिटी

मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरात ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या

Sangli News : कृष्णेच्या डोहात ८ फूट लांबीच्या मगरीचा वावर; औदुंबर घाटावर भाविकांची गर्दी

सांगली : औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात सध्या तब्बल ८ ते १० फूट लांबीची मगर वावरत असल्याचे दिसून येत आहे. दररोज

Rakhi Sawant : राखी सावंतविरोधात थेट एनआयएकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत तिच्या अतरंगी वक्तव्यांमुळे, सोशल मीडियावरील

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख

Pune Ganeshotsav : पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून तयारीचा आढावा; गर्दीच्या ठिकाणी २४ तास पोलिसांचा बंदोबस्त पुणे :

Oil price hike : कच्च्या तेलाच्या दरवाढीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम; महागाई वाढण्याची आणि रुपया कमजोर होण्याची शक्यता

नवी दिल्ली: