Nashik : आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी अग्निवीराचा मृत्यू , २० वर्षीय जवानाने बॅरेकमध्ये घेतला टोकाचा निर्णय

Nashik : भारतीय सैन्यदलात नुकताच दाखल झालेल्या २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराचा नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center at Nashik Road) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विन एम. असे मृत अग्निवीराचे नाव असून, तो मूळचा केरळचा रहिवासी होता. त्याने सहा महिन्यांच्या प्रशिक्षणापैकी दहा आठवडे प्रशिक्षण पूर्ण केले होते. (Nashik News)



बॅरेकमध्ये आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत


पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजून ४० मिनिटांनी आर्टिलरी सेंटरमधील अशोक चक्र गेटजवळील आर्मी बॅरेकमध्ये अश्विन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही बाब लक्षात येताच लष्करी सहकाऱ्यांनी त्याला तातडीने खाली उतरवलं आणि उपचारांसाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.


घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात अश्विनजवळ कोणतीही मृत्यूपूर्वीची चिठ्ठी किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी सागर पुंजाराम मुतकुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलिस ठाण्यात (Upnagar Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik News)



मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट


अश्विन हा देशसेवेचं स्वप्न घेऊन अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाला होता. प्रशिक्षणाच्या काळातच त्याचा मृत्यू झाल्याने सहकारी आणि प्रशिक्षकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती केरळमधील त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, ते नाशिककडे रवाना झाले आहेत. अश्विनच्या मृत्यूमागे मानसिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक तणाव होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल, पोलिस तपास आणि लष्करी पातळीवरील चौकशीनंतरच या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. सध्या मृत्यूमागील ठोस कारण समोर आलेलं नाही.

Comments
Add Comment

Somalia Attack: सोमालियात अल-कायदाशी संबंधित अल-शबाबच्या भीषण हल्ल्यात 20 सैनिकांचा मृत्यू, लष्कराच्या दाव्याने खळबळ

मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या

WPL 2027 Auction Live: सोफी मोलिन्यूसाठी युपी वॉरियर्सने मोजले 1.10 कोटी

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी

INDW Vs ZIMW: टी20 नंतर झिम्बाब्वेला वनडे मालिकेत क्लिन स्विप, स्मृती मंधानाच्या नेतृत्वात विजयी घोडदौड

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी येथे पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल

AUS vs SA Test Match: स्टार्क समाधानी, पण ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर काय म्हणाला?

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने

बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशनवरून वाद; स्काउटने लव्हला केलं नॉमिनेट, लव्ह गिल भावूक

बिग बॉसच्या सीजन 20 मध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. टास्कदरम्यान होणारी भांडणं, मैत्री यामुळे हा सीजन अधिक

Nashik : नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित

Nashik : कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील