Saturday, September 12, 2026

Crime News : अरे देवा... ! लग्न झालं, पण नववधू सासरी पोहोचलीच नाही ! वराला रस्त्यात उतरवून...

Crime News : अरे देवा... ! लग्न झालं, पण नववधू सासरी पोहोचलीच नाही ! वराला रस्त्यात उतरवून...

UP Crime News : लग्नानंतर नववधूसोबत सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या वराला धक्कादायक फसवणुकीचा सामना करावा लागलाय. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये लग्न झाल्यानंतर नववधू सासरी जाण्याऐवजी वराला भररस्त्यात गाडीतून उतरवून दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. (UP Crime News)

व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून लग्नाचं आमिष

पोलिसांच्या माहितीनुसार, हरदोई जिल्ह्यातील बिलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छिबरामऊ गावातील रहिवासी राजकुमार याला काही जणांनी लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं. यासाठी त्यांनी राजकुमारला एका मुलीचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला. मुलगी पसंत पडल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्न ठरवलं. त्यानंतर बरदह येथील महादेव मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. (UP Crime News)

मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्न

बरदहच्या महादेवाच्या मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी वधू आणि वरपक्षाचे लोक त्या मंदिरात पोहोचले. तिथे राजकुमरा यांचं त्या मुलीशी अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न पार पडलं.लग्नावेळी वरपक्षाकडून वधूला सोन्याचे दागिने, ८० हजार रुपयांची रोख रक्कम, साड्या आणि इतर कपडे देण्यात आले. लग्नानंतर राजकुमार वधूसोबत घरी निघाला. मात्र, बंधवा वळणाजवळ वधूच्या कथित वडिलांनी आणि इतर साथीदारांनी गाडी थांबवली. यानंतर त्यांनी राजकुमारला गाडीतून खाली उतरवलं. वधू, लग्नात मिळालेले दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन सर्वजण तिथून पसार झाले. या प्रकारामुळे वरपक्षाला मोठा धक्का बसला. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (UP Crime News)

दोन महिलांसह सात जणांना अटक

तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. शुक्रवारी कोदहरा परिसरात कारवाई करत या फसवणुकीत सहभागी असलेल्या दोन महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून १९ हजार ६५० रुपयांची रोख रक्कम, मंगळसूत्र, कानातले, साड्या, कपडे, दोन दुचाकी आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >