Highway Traffic : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांचा ओघ; सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

नवी मुंबई:णेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरामधून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रचंड गर्दीमुळे शनिवारी सायन-पनवेल महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली. कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले, ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्या आणि उत्सवामुळे एकाच मार्गावर तीन-तीन लेनमधून गाड्या धावत असल्याने सकाळपासूनच वाहतूक विस्कळीत झाली होती.


?feature=share

या वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक विशेष वाहतूक व्यवस्थापन योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत कोन फाटा ते कळंबोली परिसराचा समावेश असून, वाढती कोंडी लक्षात घेता काही वाहने उरण फाटा आणि अटल सेतूच्या दिशेने वळवली जात आहेत. तसेच, पनवेल आणि कळंबोलीमधील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून सुमारे ५० अतिरिक्त वाहतूक वॉर्डनची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून पोलिसांना गर्दीचे नियोजन करणे सोपे जाईल.



उत्सवाच्या काळात हा मार्ग अत्यंत व्यस्त राहत असल्याने, मुंबईहून कोकणाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Ameesha Patel : अमीषा पटेलला लाखोंचा फटका! आईच्या घरातून डायमंड ब्रेसलेट गायब; तपासात हाऊस हेल्पर अटकेत

मुंबई : ‘गदर’ फेम अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि सुपरहिट

PM Modi's call at the BRICS Summit : ग्लोबल साउथने आता नियम पाळणारे नव्हे तर 'नियम बनवणारे' व्हावे! – ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी मुंबई : संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सुरक्षा परिषदेत आता अजिबात विलंब न करता लवकरात लवकर सुधारणा केल्या पाहिजेत,

BRICS Summit 2026 : भारताच्या कूटनीतीला मोठं यश ! इथिओपिया-मलेशियासोबत महत्त्वाचे करार, खाणकाम आणि सेमीकंडक्टर क्षेत्राला नवी दिशा

BRICS Summit 2026 : भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८ व्या BRICS शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

AMD Ryzen : एएमडीचे दोन नवीन डेस्कटॉप प्रोसेसर्स लाँच; रायझन ५ ७५०० आणि रायझन ५ ५५००एफ बाजारात दाखल

कॅलिफोर्निया:

Nafisa Joseph case : नफिसा जोसेफ आत्महत्या प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, व्यावसायिक गौतम खंडजुआ खटल्याला सामोरे जाणार

मुंबई: प्र

Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३,८०८ खातेदार पात्र ; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

Nashik : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील