Nashik : १० हजारांची लाच भोवली ! पोलीस हवालदाराला ४ वर्षांची शिक्षा

Nashik Crime News : दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. रामचंद्र आडके असं दोषी ठरलेल्या हवालदाराचं नाव असून, त्याला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये चार वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Nashik Crime News)



१५ हजारांची लाच मागितली अन्...


रामचंद्र आडके हे नाशिक तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तक्रारदार आणि त्यांच्या चुलत भावाविरुद्ध याच पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी आडके यांनी २३ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १० हजार रुपये ठरली.


लाचेची रक्कम पंच साक्षीदारांसमोर गिरणारे आऊट पोस्ट येथे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रामचंद्र आडके यांना रंगेहात पकडलं होतं. पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या आर्थिक लाभ मिळवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. (Nashik Crime News)



न्यायालयाकडून दोषी ठरवत शिक्षा


या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने रामचंद्र आडके यांना दोषी ठरवत पुढील शिक्षा सुनावली


भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ कलम ७: तीन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड.


कलम १३(२): चार वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड.


दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे सरकारी पक्षातर्फे सचिन गोरवाडकर यांनी कामकाज पाहिलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला. (Nashik Crime News)



लाच मागितल्यास तक्रार करण्याचं आवाहन


दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.



तक्रारीसाठी संपर्क :


टोल फ्री क्रमांक : १०६४


दूरध्वनी : ०२५३-२५७५६२८ / ०२५३-२५७८२३०


व्हॉट्सॲप : ९५४५६५१०६४


या खटल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी लोंढे आणि कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रदीप काळोगे, प्रभाकर गवळी, किरण धुळे यांनी कामकाज केले. या संदर्भातील माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी दिली.

Comments
Add Comment

Indoor News : इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत ब्युटीशियनचा संशयास्पद मृत्यू; ४० मिनिटे सोबत असणारा 'तो' व्यक्ती कोण ?

इंदोर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indoor News) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित हॉटेलमधील

Mary Kom : अभिमान की अहंकार? सानिया-सायनाचा उल्लेख होताच मेरी कोम म्हणाली, ‘माझ्यासारखं कुणी...’; नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘बिग बॉस २०’मध्ये मेरी कोमच्या कारकिर्दीचा आणि तिच्या यशाचा उल्लेख होत असतानाच तिच्या एका वक्तव्याने

Xi Jinping New Delhi Speech : मध्य पूर्व युद्ध रोखण्यासाठी ब्रिक्सने मध्यस्थी करावी; नवी दिल्लीतील परिषदेत शी जिनपिंग यांचे आवाहन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत बोलताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मध्य

Ishan Kishan injury : इशान किशन सरावादरम्यान पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त; अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली

नवी दिल्ली:

Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

- १३ आणि १४ सप्टेंबरला विविध कार्यक्रम; एशियाटिक सोसायटी, हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार मुंबई :

India UAE Ties : ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अबू धाबीच्या युवराजांची महत्त्वपूर्ण भेट; भारत-यूएई संबंधांवर भर

नवी दिल्ली: १८ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने १२ सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू धाबीचे