Tuesday, September 15, 2026

Belgaum News: बेळगावमध्ये काळाचा घाला ! भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Belgaum News: बेळगावमध्ये काळाचा घाला ! भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Belgaon : देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच बेळगावमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेश चतुर्थीच्या रात्री चव्हाट गल्ली परिसरातील एका दुकानाला आणि घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. (Belgaum Fire Accident News)

मध्यरात्री घराला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा दिला. आग वेगाने पसरल्याने घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत गजानन दमोने (६५), शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०) आणि रोशन दमोने (२१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Belgaum Fire Accident News)

फ्रिजच्या स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज

घरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. ज्यामुळे सर्व जळून खाक झाले. मजुरी करून हे कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह करत असे. या कुटुंबासोबत झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण चव्हाट गल्ली परिसर सुन्न झाला आहे. ही दुर्घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, पोलिस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी लगेच धाव घेतली होती आणि आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील आणखी तपास सुरु आहे. (Belgaum Fire Accident News)

पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.आगीचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरी आगीचे अंतिम कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >