Tuesday, September 15, 2026

SRK Reacts on Dhurandhar : किंग खानही झाला ‘धुरंधर’चा फॅन! म्हणाला, 'मी या चित्रपटाचे...'

SRK Reacts on Dhurandhar : किंग खानही झाला ‘धुरंधर’चा फॅन! म्हणाला, 'मी या चित्रपटाचे...'

मुंबई : रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ या सिनेमाने २०२५ आणि २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा निर्माण केली. दमदार कथा, तगडी स्टारकास्ट आणि जबरदस्त अभिनयामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने मोठी कमाई केल्याचं सांगितलं जात असून, ‘धुरंधर’ फ्रेंचायझीने ३ हजार कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन केल्याची चर्चा आहे. आता बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाननेही ‘धुरंधर’ पाहिल्याचं सांगत या सिनेमावर आपलं मत व्यक्त केलं आहे. (SRK Reacts on Dhurandhar)

नुकत्याच झालेल्या ‘Ask SRK’ सेशनमध्ये शाहरुख खानने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. याचदरम्यान एका चाहत्याने शाहरुखला, “तुम्ही ‘धुरंधर’ पाहिला आहे का?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला शाहरुखने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (SRK Reacts on Dhurandhar)

‘मी धुरंधरचे दोन्ही पार्ट पाहिले आहेत...’

चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खानने सांगितलं की, “मी ‘धुरंधर’चे दोन्ही पार्ट पाहिले आहेत. मला हा चित्रपट खूप आवडला. संपूर्ण टीमने खरंच खूप कमालीचं काम केलं आहे.”

शाहरुखच्या या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील एका मोठ्या सुपरस्टारने रणवीर सिंहच्या या चित्रपटाचं केलेलं कौतुक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (SRK Reacts on Dhurandhar)

रणवीरसोबत तगडी स्टारकास्ट

‘धुरंधर’ चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य रॉय धर यांनी केलं आहे. रणवीर सिंहसोबत या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथानकासोबतच कलाकारांच्या अभिनयाचंही मोठ्या प्रमाणात कौतुक झालं आहे. (SRK Reacts on Dhurandhar)

बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबाबतही ‘धुरंधर’ची जोरदार चर्चा झाली. या फ्रेंचायझीने ३ हजार कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन केल्याचं बोललं जात आहे. (SRK Reacts on Dhurandhar)

आता शाहरुखच्या ‘किंग’ची उत्सुकता

दरम्यान, शाहरुख खान आता आपल्या आगामी ‘किंग’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’नंतर शाहरुखला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘किंग’मध्ये अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत आणि राघव जुयाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं बजेट तब्बल ४५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ‘पठाण’ आणि ‘जवान’नंतर शाहरुख खानचा ‘किंग’ बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा धमाका करणार का, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. (SRK Reacts on Dhurandhar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >