Pimpri firing : पिंपरी हादरली! गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला जाधववाडीत तरुणावर गोळीबार; जुन्या आर्थिक वादातून खळबळ

पिंपरी-चिंचवड: गणेशोत्सवाच्या आनंदात आणि उत्साहात असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जाधववाडी परिसरात जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून एका तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या थरारक घटनेमुळे परिसरात आणि संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.(Pimpri firing)



नेमकी घटना कशी घडली?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी धनाजी घोगरे (वय ३५) हे १४ सप्टेंबर रोजी पहाटे २:१५ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील ओलियो हॉटेलजवळ आले होते. त्याच वेळी मुख्य आरोपी स्वप्नील कांताराम जाधव आणि त्याचा चालक रोशन पिंगळे तिथे उपस्थित होते. पूर्ववैमनस्य आणि जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून रवी घोगरे आणि आरोपींमध्ये बाचाबाची सुरू झाली. वाद वाढल्यानंतर आरोपी स्वप्नील जाधव याने "तुला आज जिवंत सोडत नाही" अशी धमकी देत आपल्या जवळील पिस्तूल काढून रवी यांच्या दिशेने थेट गोळी झाडली. या अचानक झालेल्या हल्ल्यात रवी घोगरे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच दशत पसरली. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.(Pimpri firing)



आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; मुद्देमाल जप्त


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिखली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जखमी रवी घोगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी स्वप्नील कांताराम जाधव आणि चालक रोशन पिंगळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय शस्त्र कायद्यान्वये (Arms Act) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. चिखली पोलिसांनी धडक कारवाई करत दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, वाहन आणि मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे करत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Pimpri firing)

Comments
Add Comment

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक गटात मोठे बदल; पोलार्डच्या नेतृत्वाखाली दिग्गज खेळाडूंची नवीन इनिंग सुरू

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक गटात मोठे आणि आश्चर्यकारक

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल

Anand Paranjape: महायुतीत समन्वयाची गरज; मित्र पक्षांनी परस्परांवर आरोप टाळावेत

ठाणे: महायुतीमधील घटक पक्षांनी समन्वयाची भूमिका ठेवावी आणि परस्परांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे

World Record: T20 मध्ये नवा इतिहास, दिग्गज गोलंदाजही मागे; राशिद खानचा क्रिकेट विश्वात नवा विक्रम

[caption id="attachment_1070550" align="aligncenter" width="800"] अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखा विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

[caption id="attachment_1070541" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरचं नशिब जोरदार असल्याचं दिसत आहे. खरं तर

Jalgaon Accident News : जळगाव–भुसावळ महामार्गावर भीषण अपघात, चालकाचा मृत्यू

Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगाव–भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर