Ritu Tawde : महापौर निवासस्थानी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणेशोत्सव अंतर्गत, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तीमय वातावरणात बुधवारी १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी निरोप देण्यात आला. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात महापौर बंगल्यावरही भक्तिभावाने आणि पर्यावरण रक्षणाचा संवेदनशील संदेश देत मूर्ती विसर्जन संपन्न झाले. (Ritu Tawde)



परंपरेला निसर्गस्नेही जोड देत कृत्रिम जलकुंभात श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करून महापौरांनी स्वतः सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. महापौर निवासस्थानी विराजमान झालेली मूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीची होती. निवासस्थानाच्या आवारातच तयार केलेल्या कृत्रिम जलकुंभामध्ये या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, विसर्जनानंतर विरघळलेली पवित्र शाडूची माती आणि पाणी हे महापौर बंगल्यातील उद्यानात रोपांना, झाडांना दिले जाणार आहे. लाडक्या बाप्पाची मूर्ती मातीतून आकाराला येते आणि पुन्हा निसर्गातच विलीन होते; त्यामुळे या पवित्र मातीच्या रूपाने बाप्पा वर्षभर निसर्गाच्या पाना-फुलांतून आपल्यासोबत राहील, अशी भावना या विसर्जनावेळी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी व्यक्त केली. (Ritu Tawde)



"शब्दांपेक्षा कृतीतून दिलेला संदेश अधिक प्रभावी असतो," असे नमूद करत महापौरांनी मुंबईकरांना पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले. मुंबईतील समुद्र किनारे, चौपाट्या आणि नैसर्गिक तलाव हे आपले वैभव आहेत. त्यांचे रक्षण करणे हीच बाप्पाच्या चरणी खरी सेवा आहे. मुंबई महानगरपालिकेने जागोजागी कृत्रिम तलावांची उत्तम व्यवस्था केली आहे. नागरिकांनी मूर्ती विसर्जन या कृत्रिम तलावांमध्ये करावे, असे कळकळीचे आवाहन महापौर तावडे यांनी सर्व मुंबईकरांना केले आहे. (Ritu Tawde)

Comments
Add Comment

Disha Salian Case : सतीश सालियन यांच्या वतीने आदित्य ठाकरेंच्या दाव्यांवर गंभीर आक्षेप; कायदेशीर लढा तीव्र

मुंबई : दिवंगत दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेचे

Central Railway : मध्य रेल्वेकडून बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू; १७ सप्टेंबरला उद्घाटनपर विशेष गाडी धावणार

मुंबई : मराठवाडा विभाग आणि पुणे यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रवाशांची

FDA Action : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; बनावट पनीर, दूध उत्पादने आणि प्रतिबंधित अन्नसाठा मोठ्या प्रमाणावर जप्त

मुंबई : ग्राहकांची दिशाभूल करून आण

Maharashtra Jobs : ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी; महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्हा, तालुका आणि स्थानिक परिसरात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून

Nitin Nabin : नितीन नबीन यांनी घेतले सिद्धिविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिला मुंबई दौरा; कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत मुंबई :

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि