मुंबई : मराठवाडा विभाग आणि पुणे यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेकडून बीड आणि पुणे दरम्यान पहिली थेट आणि दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि इतरमान्यवरांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२६ रोजी बीड रेल्वे स्थानकावरून या बीड-पुणे उद्घाटनपर विशेष गाडीला (गाडी क्र. ०१४०१) हिरवा झेंडा दाखवला जाईल.(Central Railway Beed Pune)
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर-बीड विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरू होणारी ही रेल्वे सेवा या प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.
गाडीचे मार्ग आणि थांबे
बीड ते पुणे धावणारी ही उद्घाटनपर विशेष गाडी खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल:
-
अमळनेर भांड्याचे
-
नवीन आष्टी
-
नारायणडोह
-
अहिल्यानगर
-
श्रीगोंदा रोड
-
दौंड कॉर्ड लाईन
-
उरुळी
डिजिटल, सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवण्यावर भर नाशिक : पुढील वर्षी ...
डब्यांची रचना (Coach Composition)
ही विशेष गाडी खालील डब्यांच्या संरचनेसह प्रवाशांच्या सेवासांठी उपलब्ध असेल:
-
२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2 Tier)
-
३ वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3 Tier)
-
४ शयनयान श्रेणी (Sleeper)
-
४ सामान्य द्वितीय श्रेणी (General)
-
१ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन
-
१ जनरेटर व्हॅन
बीड आणि पुणे शहरांचे महत्त्व
-
बीड: हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील ऐतिहासिक जिल्हा असून समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. येथे ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर असून, हा जिल्हा परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग व अंबाजोगाई यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या जवळ आहे. हा प्रामुख्याने कृषीप्रधान जिल्हा आहे.(Central Railway Beed Pune)
-
पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि 'पूर्वेकडील ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाणारे पुणे हे एक प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी (IT) केंद्र आहे. मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे पुणे हे महत्त्वाचे जंक्शन असल्याने बीड व परिसरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.(Central Railway Beed Pune)
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या आगामी ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...
नवीन रेल्वे सेवेचे प्रमुख फायदे
१. पहिली थेट रेल्वे जोडणी: बीडला पुण्याशी जोडणारी ही पहिलीच थेट रेल्वे सेवा ठरणार असून, यामुळे हा 'आकांक्षी जिल्हा' भारताच्या प्रवासी रेल्वे नकाशावर अधिकृतपणे येईल.
२. प्रवाशांसाठी सोयीची: शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि तीर्थयात्रेसाठी पुण्याला प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, रोजचे प्रवासी, व्यापारी, भाविक आणि रुग्णांचा प्रवास सुकर होईल.
३. सामाजिक-आर्थिक चालना: रस्तेमार्गाच्या तुलनेत हा प्रवास जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होईल. प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि कृषी उत्पादनांची ने-आण सुलभ होईल.
४. प्रादेशिक एकात्मता: या सेवांमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल.(Central Railway Beed Pune)






