मुंबई : ग्राहकांची दिशाभूल करून आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हाती घेतलेली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. राज्यभरात उडपी स्वाद रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनापासून ते विविध जिल्ह्यांत कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यापर्यंत मोठी कारवाई करण्यात आली आहे.(FDA Action)
उडपी स्वाद रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनावरील सुनावणीत उच्च न्यायालयाचा नकार
ठाणे येथील ‘मे. उडपी स्वाद रेस्टॉरंट’मध्ये पनीरच्या नावाखाली ‘चीज अॅनालॉग’ (Cheese Analogues) वापरले जात असल्याचे उघडकीस आले होते. शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात या पनीरमध्ये दुग्धजन्य घटकांऐवजी बाहेरील चरबी (Foreign Fat) असल्याचे निष्पन्न झाल्याने अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी हा नमुना 'असुरक्षित' घोषित करून परवाना तात्काळ निलंबित केला होता. या निलंबन आदेशाविरोधात रेस्टॉरंट चालकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे शासनाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने प्रशासनाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि रेस्टॉरंटची याचिका फेटाळून लावली. तसेच, परवाना निलंबन प्रकरणी अन्न सुरक्षा आयुक्तांकडे अपील करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.(FDA Action)
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या आगामी ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...
छ. संभाजीनगर व अमरावती विभागात प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
-
छत्रपती संभाजीनगर: १५ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मोहीम राबवून गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध साठवणूक आणि वाहतुकीवर छापा टाकला. यात १२,७४,०५० रुपयांचा अन्नसाठा आणि ३,००,००० रुपयांचे वाहन असा एकूण १५,७४,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १ आस्थापनेविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करून २ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
-
अमरावती: याच दिवशी अमरावती विभागात कारवाई करून २३,२०० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
दूध, दुग्धजन्य पदार्थ व मिठाईवरील राज्यव्यापी कारवाई
-
पालघर: चारोटी टोल नाक्यावर (NH-48) तपासणीदरम्यान वाहनातून विनालेबल, अस्वच्छ वातावरणात आणि योग्य तापमान नियंत्रणाशिवाय वाहतूक केला जाणारा ८७८ लिटर चीक (Colostrum) ₹१,०५,३६० किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
-
पुणे:
-
'मे. डेक्कन कोल्ड स्टोराज इंडिया प्रा. लि.' (भोर) येथे ४,८९१.९ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटर (किंमत ₹४,१५,६२५) लेबलिंग नियमांचे उल्लंघन व भेसळीच्या संशयावरून तपासणीच्या फेऱ्यात आले आहे.
-
मंचर (आंबेगाव) येथील 'महावीर डेअरी'मध्ये निकृष्ट दर्जाचा खवा, पनीर व तूप असा एकूण ५२,८४० रुपयांचा साठा आढळला.
-
हडपसर येथील 'अमर स्वीट' आणि 'चैतन्य स्वीट' येथे विनालेबल व अस्वच्छ वातावरणात साठवलेला खवा आणि बर्फी जप्त करण्यात आली.
-
-
कोल्हापूर: शाहूनगरमधील 'कोल्हापूर मिल्क अँड बेकर्स'मध्ये संशयास्पद पनीर व श्रीखंड (किंमत ₹२३,९५०) जप्त करण्यात आले. तसेच शिरोळ येथे गुलाबजाम स्पेशल मिक्सची नियमबाह्य वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली, ज्यामध्ये व्हे पावडर व वनस्पती तेलाचा वापर केल्याचे समोर आले आहे.
-
इतर जिल्हे: परभणी (जिंतूर), जालना, अहिल्यानगर आणि सांगली येथेही अस्वच्छ परिसर, लेबलदोष आणि निकृष्ट दर्जाच्या खवा, पनीर, गूळ, मोदक पेढा, फरसाण, बुंदी व मैसूरपाकची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे.(FDA Action)
मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा हाती घेतलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षातील भूमिका अधिक ठळक ...
प्रशासनाचे कडक इशारा व आवाहन
कोणत्याही खाद्यपदार्थ व्यावसायिकाने ग्राहकांना पूर्वकल्पना न देता पनीर किंवा अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली कृत्रिम किंवा बनावट घटकांचा वापर करू नये, असा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर परवाना रद्द करणे, आस्थापना बंद करणे आणि फौजदारी खटले दाखल करण्यासारख्या कठोर कारवाया सुरूच राहतील.(FDA Action)
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा कोणत्याही गैरप्रकाराबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ किंवा Food & Drug Grievance Portal वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.






