Mumbai Ganpati Darshan : परदेशी पाहुण्यांनाही मुंबईच्या गणेशोत्सवाची भुरळ

- विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणपतीचे घेतले दर्शन


मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन जगभरातील पर्यटकांना घडविणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील विविध गणेशमंडळांना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यामध्ये फिनलंड, फ्रान्स, थायलंड, नॉर्वे, चीन, बेल्जियम, स्वीडन आणि इजिप्त या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचा गणेशोत्सव, त्याची ऐतिहासिक परंपरा आणि मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची माहिती या प्रतिनिधींना देण्यात आली.


पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे, सामाजिक एकतेचे आणि लोकसहभागाचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा, इतिहास, लोकजीवन आणि आतिथ्यशीलता जगभर पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (Mumbai Ganpati Darshan)



माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात परदेशी पाहुण्यांचे पारंपारिक फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी मुंबईतील ऐतिहासिक आणि लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांतील गणेशाचे दर्शन घेतले. माटुंगा येथील जी.एस.बी. गणपती, वडाळा येथील जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव-गणेश गल्ली येथील ‘मुंबईचा राजा’, गिरगावातील केशवजी नाईक चाळ येथे भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा होणारा प्रमुख उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, लोकपरंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश याची माहिती पाहुण्यांना देण्यात आली. (Mumbai Ganpati Darshan)



गणेशोत्सवाच्या निमित्ताने फिनलंडच्या उप वाणिज्यदूत जोन्ना सुनी, फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हरिनो आणि सामंथा नुवेल, थायलंडच्या वाणिज्यदूत सिरिपॉर्न सुपानिमितविसेतकुल, वाणिज्यदूत थितीपोर्न चुचिन्नावत, नाक्रिसोर्न क्लाइकाओ आणि व्हाइस कॉन्सुल अरुणलुक इम्सुब यांनी सहभाग घेतला. नॉर्वेच्या वाणिज्यदूत मोनिका ओम्मुंडसेन नागेलगार्ड आणि जेनी ब्रँडाल, बेल्जियमचे वाणिज्यदूत पियरे स्टेव्हर्लिन्क तसेच स्वीडनच्या वाणिज्यदूत यांच्या पत्नी साने यामादा यांची उपस्थिती होती. चीनच्या वतीने वाणिज्यदूत जी श्युएचुई, कॉन्सुल वांग जिनशेंग, उपवाणिज्यदूत मा झोउचेन, झू युचियान, लिन, वू तसेच कॉन्सुलेटमधील अन्य अधिकारी व कुटुंबीय सहभागी झाले. इजिप्तच्या वाणिज्यदूत जनरल दिना अल अहे यांचाही सहभाग होता. (Mumbai Ganpati Darshan)

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : मुंबईच्या इच्छापूर्ती मंडळात अवतरली कोकणातील 'ज्ञानाची पालखी'; बाप्पाच्या चरणी 'विद्या दानाचा' देखावा!

प्राची शिरकर मुंबई : गणेशोत्सव म्हणजे केवळ भव्य देखावे आणि आरास नव्हे, तर 'श्रद्धेतून संस्कृती आणि संस्कृतीतून

Lalbaugcha Raja eco friendly plates : लालबागच्या राजाचा प्रसाद आता 'इको-फ्रेंडली' ताटात; प्लास्टिकला फाटा देत १,५८० किलो कार्बन उत्सर्जन रोखले

मुंबई : 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) चरणी लीन होणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा एक अत्यंत स्तुत्य आणि

Ganeshotsav 2026 : “स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार - आपले सफाई कर्मचारी!”

सफाई कर्मचाऱ्यांना पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अनोखी मानवंदना! कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांची

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षांच्या 'बिजली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू!

मुंबई : बोरीवली येथील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (Sanjay Gandhi National Park) एक दुःखद बातमी समोर आली आहे. २०१६

BMC News : महापालिका आयुक्तांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त लावले राणीबागेत ‘सेंच्युरी पाम’

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियान अंतर्गत आणि

Mumbai Police Mounted Unit : मुंबई पोलिसांचे ऐतिहासिक 'घोडदळ' पुन्हा सेवेत; गणेशोत्सवात चौपाट्यांवर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या पाहता १९३२ मध्ये बंद करण्यात आलेले मुंबई पोलिसांचे विशेष