Nitin Nabin : नितीन नबीन यांनी घेतले सिद्धिविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिला मुंबई दौरा; कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत


मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नितीन नबीन यांनी बुधवारी पहिल्यांदाच मुंबईला भेट दिली. एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या नबीन यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या नबीन यांनी देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. (Nitin Nabin)


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी नबीन यांचे आगमन होताच शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर नबीन सिद्धिविनायक मंदिराकडे रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, पणनमंत्री जयकुमार रावल, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आमदार संजय उपाध्याय, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्यासह भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. (Nitin Nabin)



सिद्धिविनायक मंदिरात पूजा केल्यानंतर नबीन यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार पवन त्रिपाठी यांनी नबीन तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नबीन यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रथमच येणे हा आपल्यासाठी शुभ आणि सौभाग्याचा क्षण असल्याचे सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी नबीन यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष हा भारतीय संस्कृती आणि परंपरांचा उद्घोष असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा काळ सुरू असल्याचा दावा करत भारत विकासाच्या दिशेने पुढे जात असल्याचे नबीन म्हणाले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे असून राज्य सरकार आणि जनता या दोन्हींचा त्यात सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले. (Nitin Nabin)



दुपारी नबीन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिल येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. नबीन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. पुढे वांद्रे रेक्लमेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (Nitin Nabin)

Comments
Add Comment

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि

Mumbai Ganpati Darshan : परदेशी पाहुण्यांनाही मुंबईच्या गणेशोत्सवाची भुरळ

- विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणपतीचे घेतले दर्शन मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक

Mumbaicha Raja 2026 : गणेश गल्लीतील गणपती बाप्पाच्या 'त्या' हाताच्या मुद्रेमागे नक्की काय रहस्य आहे ?

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात (Ganeshotsav 2026) संपूर्ण मुंबई शहर उजळून निघाले असून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी

Nitin Nabin : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा पहिला मुंबई दौरा; सिद्धिविनायक आणि ‘लालबागच्या राजा’चे घेतले दर्शन

मुंबई : महाराष्ट्राच्या सुरम्य सांस्कृतिक वातावरणात आणि गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026) मोठ्या उत्साहात भारतीय जनता

Disha Salian Case : CBI ची 'लेडी सिंघम' उकलणार दिशा सालियन मृत्यूचे गूढ; सीमा पाहुजांवर मोठी जबाबदारी!

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Murder Case) यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास

Ganpati Visarjan : मुंबईत दीड दिवसांच्या 61,528 गणपतींचे विसर्जन; भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला मोठा प्रतिसाद मिळाला. 16 सप्टेंबर