Raipur Crime News : विवाहित प्रेयसीला निर्जनस्थळी नेलं अन् पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, धक्कादायक कारण समोर

Raipur Crime News : छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेयसीला आधी निर्जनस्थळी नेलं, गाडीच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढली आणि तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. गंभीर भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या २६ वर्षीय प्रियकराला अटक केली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. वीरू धीवर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, मृत महिलेचं नाव राजकुमारी साहू आहे.



लग्नातील अडथळे आणि...


प्राथमिक तपासानुसार, राजकुमारीचा इतर व्यक्तींशी असलेला संपर्क आणि दोघांच्या लग्नात निर्माण होणारे कथित अडथळे यामुळे वीरू संतापलेला होता. याच कारणातून त्याने हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना रायपूर जिल्ह्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, वीरूने हत्येपूर्वीच संपूर्ण कटाचं नियोजन केलं होतं. पोलिसांना आपलं लोकेशन मिळू नये आणि मोबाईलच्या माध्यमातून आपला माग काढता येऊ नये, यासाठी त्याने मोबाईल घरी ठेवून बंद केला होता. त्यानंतर त्याने पेट्रोल पंपावरून बाटलीत पेट्रोल घेतलं आणि ते स्वतःच्या गाडीच्या डिक्कीत ठेवले.



विमानतळामागील निर्जन रस्त्यावर भयंकर कृत्य


योजना पूर्ण केल्यानंतर वीरू राजकुमारीला रायपूर विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्माणाधीन आणि निर्जन रस्त्यावर घेऊन गेला. तिथे दोघांमध्ये जुन्या कारणावरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर वीरूने गाडीच्या डिक्कीत ठेवलेली पेट्रोलची बाटली बाहेर काढली. राजकुमारीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे.आगीचा भडका उडताच राजकुमारी जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी धावत होती. मात्र आरोपी तिला त्याच अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाला.


याचदरम्यान विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) टॉवरवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाचं लक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या महिलेकडे गेलं. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. राजकुमारीचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकही घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.



आरोपीचा याआधीही गुन्हेगारी इतिहास


राजकुमारी ही मूळची समोदा परिसरातील रहिवासी होती. सुमारे आठ वर्षांपूर्वी तिचा विवाह आरंग परिसरातील मोखला येथे झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी तिची वीरू धीवरशी ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या संबंधावरून २०२१ मध्ये झालेल्या वादात वीरूने राजकुमारीच्या सासूवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. दरम्यान, राजकुमारीच्या हत्येप्रकरणी आरोपी वीरू धीवरला अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासह श्री गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पूर्वतयारीचा

Girish Mahajan : मनोज जरांगेंची १३वी मागणी पूर्ण करणे अशक्य

मंत्री गिरीश महाजन; कायद्यात बसत नसलेल्या मागणीचा आग्रह धरू नये मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील

Mumbaicha Raja 2026 : गणेश गल्लीतील गणपती बाप्पाच्या 'त्या' हाताच्या मुद्रेमागे नक्की काय रहस्य आहे ?

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात (Ganeshotsav 2026) संपूर्ण मुंबई शहर उजळून निघाले असून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी

India's First Dengue Vaccine : डेंग्यूचा धोका होणार कमी? भारताची स्वदेशी ‘DengiAll’ लस २०२७ मध्ये येण्याची शक्यता

मुंबई : पावसाळा सुरू झाला की भारतात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि प्लेटलेट्स

Bhiwandi Fire : भिवंडीतील उमर अपार्टमेंटच्या पार्किंगला भीषण आग; १४ दुचाकी जळून खाक, एक महिला रुग्णालयात दाखल

भिवंडी : बुधवारी पहाटे भिवंडीच्या खंडुपडा परिसरातील उमर अपार्टमेंटच्या तळघरातील पार्किंगमध्ये एका भीषण आगीची

India Pakistan : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र निषेध

नवी दिल्ली : उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय नौदल आणि पाकिस्तान नौदलाच्या जहाजांमध्ये